मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेल्या मटकीची चार्ट

Photo of Sporutes mot chat by Rohini Rathi at BetterButter
1692
3
0.0(0)
0

मोड आलेल्या मटकीची चार्ट

Oct-13-2018
Rohini Rathi
790 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेल्या मटकीची चार्ट कृती बद्दल

मोड आलेली कडधान्य आहे खूप स्वादिष्ट व पौष्टिक असतात त्यात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात अशाप्रकारे मोड आलेल्या मटकीची चार्ट बनवून त्यात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो बनवलेली ही चाट स्वादिष्ट लागते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मटकी एक
  2. मीठ चवीनुसार
  3. हळदी चिमटीभर
  4. तेल एक टेबल स्पून
  5. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  6. लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून
  7. मसाला 1 तीस्पून
  8. हळदी पावडर चिमटीभर
  9. चाट मसाला अर्धा टी स्पून
  10. धना पावडर अर्धा टी स्पून
  11. मीठ चवीनुसार
  12. बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टेबल
  13. बारीक चिरलेला कांदा एक
  14. बारीक चिरलेला टोमॅटो एक
  15. लिंबाचा रस अर्धा चमचा
  16. चिरलेली कैरी अर्धा
  17. बारीक शेव आवश्यकतेनुसार

सूचना

  1. मटकी स्वच्छ धुवून तीन ते चार तास पाण्यात भिजत ठेवावे
  2. नंतर स्वच्छ धुवून कापडावर पूर्ण पसरवून कोरडी करून घ्यावी
  3. नंतर एक गरम कपडे घेऊन त्यात कोरडी केलेली मटकी बांधून गरम जागी मोड आणण्यासाठी ठेवावी
  4. नंतर मोड आलेली मटकी स्वच्छ धुऊन कुकरमध्ये मीठ व हळद घालून एक शिट्टी घेऊन शिजवून घ्यावी
  5. मटकी तील पाणी निथळून घ्यावे
  6. कढई गरम करून जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालावी
  7. त्यात लाल मिरची पावडर चाट मसाला गरम मसाला हळदी पावडर धने पूड घालून एकजीव करून घ्यावे
  8. तयार उकडलेली मटकी त्यात घालून परतून घ्यावी
  9. चवीनुसार मीठ घालावे
  10. चाट बनवण्याच्या वेळी तयार मटकी मध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो केरी कोथिंबीर शेव लिंबाचा रस घालून सर्व करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर