बेसन भिंडी मसाला | Besan Bhindi Masala Recipe in Marathi

प्रेषक Lisha Aravind  |  25th Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Besan Bhindi Masala by Lisha Aravind at BetterButter
बेसन भिंडी मसाला by Lisha Aravind
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

8235

0

बेसन भिंडी मसाला recipe

बेसन भिंडी मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Besan Bhindi Masala Recipe in Marathi )

 • भेंडी - 1/4 किलोग्रॅम / 250 ग्रॅम्स
 • तेल - 3 मोठे चमचे
 • हिंग पावडर - एक चिमूटभर
 • जिरे - अर्धा लहान चमचा
 • चण्याच्या डाळीचे पीठ / बेसन - 4 मोठे चमचे
 • लाल तिखट - अर्धा ते एक लहान चमचा
 • धणेपूड - 1 लहान चमचा
 • हळद पावडर - 1/4 लहान चमचे
 • आले - 1 इंच
 • आमचूर पावडर - 1 लहान चमचा
 • गरम मसाला पावडर - 1/4 लहान चमचा
 • कोथिंबीरीची पाने - 1 मोठा चमचा (चिरलेली)
 • मीठ - स्वादानुसार

बेसन भिंडी मसाला | How to make Besan Bhindi Masala Recipe in Marathi

 1. बेसनला मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजा. एक ताटात काढून बाजूला ठेवा.
 2. भेंडी स्वच्छ धुऊन कोरड्या करा. त्यांची दोन्ही टोके कापा. भेंड्यांचे दोन तुकडे न करता, मधोमध चिरा.
 3. एक भांड्यात 1 मोठा चमचा तेल गरम करा, त्यात भेंडी घाला. कुरकुरीत होईपर्यंत परता. एका दुसऱ्या ताटात काढून बाजूला ठेवा.
 4. पुन्हा त्याच पॅनमध्ये उरलेले तेल गरम करा. त्यात जिरे तडतडवा व नंतर हिंग घाला आणि काही सेकंद परता.
 5. आता त्यात हळद, लाल तिखट, धणेपूड, आले घाला आणि मध्यम आचेवर परता.
 6. नंतर बेसन घालून परता. तीव्र गंध जाईपर्यंत मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्या.
 7. आता यात तळलेल्या भेंड्या, मीठ आणि आमचूर पावडर घाला आणि नीट मिसळा. मसाला भेन्ड्यांना लागेल अशा प्रकारे मिसळा.
 8. आता त्याला झाकून मंद आचेवर 2-3 मिनिटे शिजवा. झाकण उघडून, तळाला मिश्रण लागू नये म्हणून नीट हलवा. पुन्हा याला झाकून 2-3 मिनिटे शिजवा.
 9. नंतर झाकण काढा. या वेळेत भेंडी चांगली शिजली पाहिजे. पुन्हा 2-3 मिनिटे मोठ्या आचेवर शिजवा. हलवत रहा.
 10. आता यात गरम मसाला घालून चांगले मिसळा. आचेवरून उतरवा.
 11. शेवटी कोथिंबीर घालून नीट हलवा.
 12. या बेसन भेंडीला पोळी, पराठा किंवा पुऱ्यांबरोबर वाढा.

Reviews for Besan Bhindi Masala Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo