मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन ग्रेवी व झट्पट पौष्टीक कोम्बडि वडे

Photo of Chikan Gravy with zhatpat Postik Kombdi Vade by samina shaikh at BetterButter
1191
1
0.0(0)
0

चिकन ग्रेवी व झट्पट पौष्टीक कोम्बडि वडे

Oct-13-2018
samina shaikh
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन ग्रेवी व झट्पट पौष्टीक कोम्बडि वडे कृती बद्दल

मी हे झट्पट वड्यांचे पीठ घरी तयार केले.दुसऱ्या पधतीने ही तुम्ही आवडीप्रमाणे डाळी घालून पीठ तयार करू शकता

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • कठीण
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी मसूर डाल (भाजून)
  2. एक वाटी चना डाल(भाजून)
  3. 2 वाटी तांदूळ पीठ
  4. अर्धी वाटी घव्हाचे पीठ
  5. अर्धी वाटी उडीद डाल(भाजून)
  6. 3चमचे जीरे
  7. 4चमचे धने
  8. 3चमचे बडिशेप
  9. मीठ(चवीनुसार)
  10. तेल
  11. चिकन अर्धा kl
  12. 1वाटी खोबरे(भाजून)
  13. 2छोटें टोमॅटो
  14. 2चमचे लाल तिखट
  15. अर्धा चमचा हळद
  16. एक चमचा आले लसुण पेस्ट
  17. अर्धा चमचा गरम मसाला
  18. कोथम्बीर
  19. 2कांदे(थोडे लालसर तेलात परतून)

सूचना

  1. डाली भाजून घ्या व मिक्सरमध्ये फिरवून चाळणीने जाड्सर पीठ चालून घ्या
  2. अक्खे धने बडिशेप व जिरे थोडे गरम करून मिक्सरमधे पावडर करून घ्या
  3. सगळया डाळी पीठ धने जिरे बडिशेप पावडर व बाकीची पीठ एकत्र करा
  4. आता एका पातेल्यात 2वाटी पीठ असेल तर अडीच वाटी पाणी उकळत ठेवा त्यात मीठ व एक चमचा तेल घाला
  5. पाण्याला उकळी आली की हळू हळू पीठ घाला व नीट एकजीव करा
  6. आता गँस बंद करून पीठ 5min झाकून ठेवा
  7. पीठ एका ताटात घेऊन गरम असतांना छान मळून घ्या व अर्धा तास झाकून ठेवा
  8. गँस वर तेल ठेवा त्यात तयार पिठाचे वडे हातावर थापुन घ्या
  9. आता हे वडे मध्यम फ्लेम वर गुलाबी रंगावर तळून घ्या
  10. खोबरे टोम्याटो कोथम्बीर कांदा मिक्सरमध्ये वाटून घ्या
  11. कढईत तेल गरम करा त्यात वाट्लेला मसाला परतून घ्या
  12. लाल तिखट आले लसुण पेस्ट गरम मसाला हळद घाला छान परतून घ्या
  13. त्यात चिकन घाला थोडे परतून घ्या
  14. थोडे पाणी व मीठ घालून चिकन शिजवुण घ्या
  15. आता चिकन रस्सा व गरमागरम वडे सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर