Photo of Dal Tadaka by Nivedita Walimbe at BetterButter
636
1
0.0(0)
0

डाल तडका

Oct-14-2018
Nivedita Walimbe
900 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाल तडका कृती बद्दल

डाळींमध्ये प्रोटिन्स भरपूर असतात, विशेषतः तुरडाळीमध्ये तर जास्त असतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तूरडाळ एक वाटी
  2. चना डाळ पाव वाटी
  3. एक मध्यम कांदा
  4. एक टोमॅटो
  5. चार - पाच लसूण पाकळ्या
  6. एक हिरवी मिरची
  7. चार लाल ब्याडगी मिरच्या
  8. तूप
  9. फोडणीचे साहित्य
  10. कडीपत्ता सात - आठ पाने

सूचना

  1. तूरडाळ आणि चणाडाळ प्रेशर कूकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावी. व्यवस्थित शिजली कि घोटून घ्यावी.
  2. निम्मा कांदा बारीक चिरून घ्यावा व निम्मा उभा पातळ चिरावा
  3. उभा चिरलेला कांदा तेलात खरपूस तळून घ्यावा व बाजूला ठेवावा. तळलेला कांदा डाळीत छान लागतो.
  4. कढईत तीन टिस्पून तूप गरम करावे.
  5. त्यात मोहोरी घालावी, तडतडू द्यावी. त्यात हिंग, हळद, चार कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. गोल्डन ब्राऊन रंगावर परतावा.
  6. टोमॅटो घालून मऊसर होईस्तोवर परतावा.
  7. नंतर घोटलेली डाळ घालावी आणि गरजेपुरते पाणी घालावे. दाल तडका थोडा घट्टसरच असतो त्यामुळे पाणी बेताचे घालावे.
  8. चवीपुरते मिठ घालून उकळी येऊ द्यावी
  9. डाळ सर्व्हींग बाउलमध्ये काढावी. कढल्यात दोन टिस्पून तूप गरम करावे त्यात जिरे, कढीपत्ता, आणि लसूण बारीक चिरलेला घालावा.
  10. लसूण जरा लालसर झाला कि लाल मिरची टाकून फोडणी तयार करावी आणि ही फोडणी तयार डाळीवर घालावी.
  11. कोथिंबीर बारीक चिरून घालावी
  12. तळलेला कांदा घालावा
  13. आपला डाल तडका तय्यार.
  14. हा जिरा राईस बरोबर छान लागतो
  15. किंवा रोटी, चपाती बरोबरहीं खाऊ शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर