मुख्यपृष्ठ / पाककृती / सोयाचंक्स बिर्यानी

Photo of Soya Chunks Biryani by Renu Chandratre at BetterButter
559
2
0.0(0)
0

सोयाचंक्स बिर्यानी

Oct-14-2018
Renu Chandratre
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोयाचंक्स बिर्यानी कृती बद्दल

पावर पॅक , फ्लेवरफुल, चमचमीत सोयाचंक्स बिर्याणी रायता सोबत । हेल्दी यम्मी आणि टेस्टी , बनवायला सोपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सोयाचंक्स 2 वाटी
  2. अर्धवट शिजलेला बासमती तांदूळ 4 वाटी
  3. उभा चिरलेला कांदा 1 वाटी
  4. तळलेला कांदा 1/2 वाटी
  5. तळलेले काजू 2 मोठे चमचे
  6. टोमॅटो उभा चिरलेला 1 वाटी
  7. ठेचलेला लसूण 1 ते 2 चमचे
  8. मीठ चवीनुसार
  9. हळद तिखट गरम मसाला चवीनुसार
  10. बिर्याणी मसाला 1 ते 2 चमचे
  11. तेल किंवा तूप 3 ते 4 मोठे चमचे
  12. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पोदिना 1 मोठा चमचा

सूचना

  1. सोयाचंक्स धुवून , गरम पाण्यात भिजवून ठेवा
  2. कांदा टोमॅटो आणि ठेचलेले लसुण तयार ठेवावे
  3. उभा चिरून तळलेला कांदा
  4. जाड बुडाच्या कढईत तेल गरम करावे , उभा चिरलेला कांदा खरपूस परतून घ्यावे। मग टोमॅटो लसून घालून तेल सुटेपर्यन्त परतावे। सर्व मसाले घालून व्यवस्थित मिक्स करावे।
  5. भिजलेले सोयाचंक्स हलक्या हाताने दाबून जास्तिचे पाणी काढून टाका। आणि फोडणी मध्ये मंद आंचेवर परतावे।
  6. अर्धवट शिजलेला भात, मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना घालून मिक्स करावे। वरून तळलेला कांदा, काजू घालून मंद आचेवर 10 मिनीटे शिजवावे।
  7. रायता सोबत गरमागरम सर्व्ह करावे।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर