मुख्यपृष्ठ / पाककृती / सोया चंक्स मटर खीमा

Photo of Soya Chunks Mutter Kheema by Shraddha Juwatkar at BetterButter
561
1
0.0(0)
0

सोया चंक्स मटर खीमा

Oct-14-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोया चंक्स मटर खीमा कृती बद्दल

सोयाबीनमध्ये डाळीच्या दुप्पट प्रमाणात प्रथिने असतात. सोयाबीन शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय आहे कारण हयात कोलेस्ट्रॉल नसतं. सोयाबीन मधील कॅल्शियम, झिंक,मॅग्नेशियम, ब गटातील, ई आणि अ जीवनसत्व असे अनेक महत्वाचे अन्न घटक आहेत.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी सोयाबीन उपयुक्त आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप सोया चंक्स
  2. 1 कप हिरवे मटार
  3. 2 टेबलस्पून आले लसूण हिरवी मिरची पेस्ट
  4. 1 मोठा कांदा बारीक चिरलेला
  5. 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला
  6. 1 टेबलस्पून लाल तिखट,गरम मसाला पावडर व किचन किंग मसाला
  7. 1 टीस्पून हळद, धणे जिरे पावडर
  8. फोडणी साठी तेल,तमालपत्र व जिरे
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. चवीनुसार मीठ

सूचना

  1. प्रथम एका पातेल्यात पाणी गरम करून सोया चंक्स घालून 5 मिनिटे उकळून घ्यावे व हिरवे मटार ही चांगले उकडून घेणे
  2. उकडलेले सोया चंक्स पाणी गाळून हाताने दाबून सर्व पाणी काढून घेणे आणि मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यावे म्हणजे आपला सोया खीमा तयार.
  3. कढई गरम करून तेल घालावे. तमालपत्र व जिरे घालून फोडणी करावी. जिरे तडतडले की कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा व त्यात हिरवी मिरची आले लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात टोमॅटो घालून व्यवस्थित मॅश करून त्यात हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर घालून खमंग परतावे.
  4. मसाला खमंग परतून झाल्यावर त्यात मटार व सोया खीमा घालून चांगले एकजीव करुन घ्यावे व मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ काढावी.
  5. पाच मिनिटांनी झाकण काढून गरम मसाला पावडर व किचन किंग मसाला घालून एक दणदणीत वाफ काढून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर