मटण करी | Mutton kari Recipe in Marathi

प्रेषक Ujwala Surwade  |  14th Oct 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Mutton kari by Ujwala Surwade at BetterButter
मटण करीby Ujwala Surwade
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

मटण करी recipe

मटण करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mutton kari Recipe in Marathi )

 • मटण पाऊण किलो
 • ४कांदे
 • १टोमॅटो
 • आलं लसूण पेस्ट एक चमचा
 • तेल
 • हींग
 • हळद
 • मीठ
 • लाल तिखट
 • गरम मसाला
 • दगडफूल
 • एक इंच दालचिनी
 • एक इंच आल
 • ८ते९लसूण पाकळ्या
 • १टीस्पून जिरं
 • १टीस्पून खसखस
 • २टीस्पून तीळ
 • कोथिंबीर
 • पाणी
 • काजू ३
 • टोमॅटो

मटण करी | How to make Mutton kari Recipe in Marathi

 1. प्रथम मटण धुऊन कुकरमध्ये टाका.
 2. त्यात 2कांदे कापलेले ,आलं लसूण पेस्ट,हींग हळद तेल मीठ पाणी टाकून ४ते५शिट्ट्या काढून घ्या.
 3. नंतर तव्यावर थोडे तेल घालून कांदा खोबर ,जिरं तीळ ,खसखस ,काजू भाजून घ्यावे.
 4. भाजलेले सर्व साहित्य आल लसूण एकत्र करून थोडे पाणी घालून वाटण तयार करावे
 5. कढईत तेल घालून गरम झाल्यावर तेजपान दालचिनी तुकडा व दगडफुल टाकून वाटण टाकून परतवा
 6. मिक्सरमध्ये टोमॅटो कोथिंबीर वाटून कढईत टाकून मसाला तेल सुटेपर्यंत परतवा.
 7. नंतर मसाल्यात धनेपूड ,लाल तिखट ,गरम मसाला घालून परतवा.
 8. कुकर गार झाले की उघडून त्यातील मटण आणि रस्सा बाऊलमध्ये काढा. यालाच अळणी कींवा सूप म्हणतात.
 9. हे सूप आजारी व्यक्ती कींवा लहान मुलांना खाण्यासाठी देतात किंवा मग सूप भातही छान लागते.
 10. कुकरमधील मटण मसाल्यात ओतून आवश्यक तेवढे पाणी घालून उकळी येऊ द्या .नंतरगरम मसाला मीठ कोथिंबीर घालून छान उकळून तरी आली की झाले मटण तयार.
 11. भात चपाती कींवा भाकरी सोबत आस्वाद घ्यावा.

My Tip:

हे सूप हेल्दी असते.

Reviews for Mutton kari Recipe in Marathi (0)