Photo of Mutton kari by Ujwala Surwade at BetterButter
1239
1
0.0(0)
0

मटण करी

Oct-14-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटण करी कृती बद्दल

पारंपरिक रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • नॉन व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मटण पाऊण किलो
  2. ४कांदे
  3. १टोमॅटो
  4. आलं लसूण पेस्ट एक चमचा
  5. तेल
  6. हींग
  7. हळद
  8. मीठ
  9. लाल तिखट
  10. गरम मसाला
  11. दगडफूल
  12. एक इंच दालचिनी
  13. एक इंच आल
  14. ८ते९लसूण पाकळ्या
  15. १टीस्पून जिरं
  16. १टीस्पून खसखस
  17. २टीस्पून तीळ
  18. कोथिंबीर
  19. पाणी
  20. काजू ३
  21. टोमॅटो

सूचना

  1. प्रथम मटण धुऊन कुकरमध्ये टाका.
  2. त्यात 2कांदे कापलेले ,आलं लसूण पेस्ट,हींग हळद तेल मीठ पाणी टाकून ४ते५शिट्ट्या काढून घ्या.
  3. नंतर तव्यावर थोडे तेल घालून कांदा खोबर ,जिरं तीळ ,खसखस ,काजू भाजून घ्यावे.
  4. भाजलेले सर्व साहित्य आल लसूण एकत्र करून थोडे पाणी घालून वाटण तयार करावे
  5. कढईत तेल घालून गरम झाल्यावर तेजपान दालचिनी तुकडा व दगडफुल टाकून वाटण टाकून परतवा
  6. मिक्सरमध्ये टोमॅटो कोथिंबीर वाटून कढईत टाकून मसाला तेल सुटेपर्यंत परतवा.
  7. नंतर मसाल्यात धनेपूड ,लाल तिखट ,गरम मसाला घालून परतवा.
  8. कुकर गार झाले की उघडून त्यातील मटण आणि रस्सा बाऊलमध्ये काढा. यालाच अळणी कींवा सूप म्हणतात.
  9. हे सूप आजारी व्यक्ती कींवा लहान मुलांना खाण्यासाठी देतात किंवा मग सूप भातही छान लागते.
  10. कुकरमधील मटण मसाल्यात ओतून आवश्यक तेवढे पाणी घालून उकळी येऊ द्या .नंतरगरम मसाला मीठ कोथिंबीर घालून छान उकळून तरी आली की झाले मटण तयार.
  11. भात चपाती कींवा भाकरी सोबत आस्वाद घ्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर