मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टर फ्राय चिकन एग अँड ब्रोकोली विथ नूडल्स

Photo of Stir fried eggs chiken broccoli and rice noodles by Anil Pharande at BetterButter
826
2
0.0(0)
0

स्टर फ्राय चिकन एग अँड ब्रोकोली विथ नूडल्स

Oct-14-2018
Anil Pharande
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टर फ्राय चिकन एग अँड ब्रोकोली विथ नूडल्स कृती बद्दल

प्रोटीन शक्ती व फायबर युक्त हेल्दी डिश

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • नॉन व्हेज
  • सोपी
  • चायनीज
  • पॅन फ्रायिंग
  • स्टर फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अंडी 2
  2. चिकन बोनलेस 250 ग्राम्स
  3. रिबन राईस नूडल्स 200 ग्राम्स
  4. ब्रोकोली 200 ग्राम्स
  5. लसूण पाकळ्या 5 ते 7
  6. सोया सॉस 2 टेबलस्पून
  7. काळी मिरी पावडर 1/4 टीस्पून
  8. मीठ चवीप्रमाणे
  9. तेल 3 टेबलस्पून

सूचना

  1. प्रथम राईस नूडल्स पाण्यातून उकळून निथळून घ्या
  2. ब्रोकोलीचे बाईट सायिझचे तुकडे करा
  3. चिकन च्या पातळ स्ट्रिप्स कापा
  4. कढईमध्ये तेल गरम करून चिकनच्या स्ट्रिप्स 2 ते 3 मिनिटे परतून घ्या
  5. बारीक चिरलेला लसूण घाला
  6. थोडेसे मीठ व काळी मिरी पावडर घाला व परतत रहा
  7. ब्रोकोलीचे तुकडे घाला व परतून घ्या, आपणास किती हवे तितके शिजवून घ्या
  8. सोया सॉस घाला व एक मिनिट परतून घ्या व प्लेटमध्ये काढा
  9. पॅनमध्ये तेल गरम करा त्यात अंडी फेटून घाला व स्क्रॅम्बल करून घ्या
  10. त्यामध्ये निथळून घेतलेले नूडल्स घाला व मिक्स करा
  11. त्यात फ्राय केलेले चिकन व ब्रोकोली घाला व एक मिनिट स्टर फ्राय करा व सर्व्हिंग डिशमध्ये घ्या व गरमागरम वाढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर