मुख्यपृष्ठ / पाककृती / मॅगी नुडल्स पकोडा फ्रिटर्स

Photo of Maggi Noodles Pakoda Fritters by Manisha Lande at BetterButter
320
3
0.0(0)
0

मॅगी नुडल्स पकोडा फ्रिटर्स

Oct-15-2018
Manisha Lande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॅगी नुडल्स पकोडा फ्रिटर्स कृती बद्दल

मॅगी नुडल्स तर आपण खातोच पण आज हि टेस्टी चमचमीत कुरकुरीत भजी खाऊन जिभेचे चोचले पुरवूया..

रेसपी टैग

  • मॅगी
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. १ पॅकेट मॅगी नुडल्स
  2. १ वाटी बेसन
  3. १ मोठा चमचा तांदूळ पीठ
  4. २ मोठे चमचे किसलेला कोबी
  5. २ मोठे चमचे किसलेलं गाजर
  6. १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
  7. १ मोठा चमचा लाल तिखट
  8. १/४ चमचा चाट मसाला
  9. १/४ चमचा ओवा
  10. १/४ चमचा हिंग
  11. चवीनुसार मीठ

सूचना

  1. प्रथम मॅगी नुडल्स गरम पाण्यात ८०% शिजवून घेतली व झाकून ठेवली.
  2. एका पसरट भांड्यात शिजवलेली मॅगी नुडल्स, बेसन, तांदूळ पीठ, कोबीचा किस, गाजराचा किस, व बारीक चिरलेला कांदा, व चवीनुसार मीठ घालून मिश्रणाला पाणी सुटेपर्यंत सर्व छान एकजीव करून घेतले व थोडावेळ झाकून ठेवले.
  3. नंतर भजी च्या मिश्रणात लाल तिखट, चाट मसाला, ओवा, व हिंग घालून पुन्हा छान एकजीव करून घेतले.
  4. कढई गॅसवर ठेवून त्यात तेल गरम करत ठेवले, तेल तापल्यावर त्यात हाताने भाजीच्या पीठाचे छल्ले बनवून हळुवार तेलात सोडून भजी / पकोडे छान सोनेरी रंगावर खमंग तळून घेतले.
  5. तयार मॅगी नुडल्स पकोडा सर्व्हींग डिशमध्ये काढून टोमॅटो सॉस बरोबर गरमागरम सर्व्ह केली.
  6. "मॅगी नुडल्स पकोडा फ्रिटर्स" खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर