मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट चिवडा

Photo of Quick mixture by Shruti Brown at BetterButter
487
4
0.0(0)
0

झटपट चिवडा

Oct-15-2018
Shruti Brown
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट चिवडा कृती बद्दल

दिवाळीचा फराळ असो वा प्रवासात घेऊन जाणारा सुका खाऊ ते अगदी घरी कोणी पाहुणे आले तर चहा सोबत सर्व्ह करण्यासाठी तर कधी खूप भूक लागलेली असताना पटकन तोंडात टाकून भूक मिटवायला मदत करणारा खुसखुशीत असा हा स्नॅक्स पदार्थ म्हणजे चिवडा .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 6

  1. १/२ किलो पातळ पोहे
  2. १ वाटी फुटाणा डाळ
  3. १ वाटी शेंगदाणा
  4. ६-८ बारीक चिरलेली हिरवी मिरची
  5. १५-२० कढीपत्ता पान
  6. १ मोठा चमचा साखर
  7. १ मोठा चमचा मोहरी
  8. १ मोठा चमचा तीळ
  9. १ मोठा चमचा धणे
  10. १ मोठा चमचा बडीशेप
  11. चवीनुसार मीठ
  12. आवश्यकतेनुसार तेल

सूचना

  1. सर्व साहित्य लागेल तेवढे काढून घ्यावे
  2. प्रथम पोहे एका मोठ्या पॅन मध्ये मंद आचेवर १० मिनिटं खरपूस परतून घ्यावेत. पोहे दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे
  3. आता त्याच पॅनमध्ये डाळ भाजून ती पोह्यात घालावी
  4. आता त्याच पॅनमध्ये शेंगदाणे भाजून ती पोह्यात घालावे
  5. आता १ चमचा तेल गरम करून त्यात हिरवी मिरची कुरकुरीत तळून घ्यावी
  6. नंतर कढीपत्ता तळून घ्यावा
  7. आता पॅनमध्ये मोहरी धणे बडीशेप आणि तीळ परतून घ्यावे
  8. आता या पोह्यांचा मिश्रणात साखर आणि मीठ घालून एकत्र करून घ्यावे .
  9. चटपटीत खुसखुशीत खमंग चिवडा खायला तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर