मुख्यपृष्ठ / पाककृती / पाणीपुरी

Photo of Pani Puri by Suchita Wadekar at BetterButter
531
2
0(0)
0

पाणीपुरी

Oct-17-2018
Suchita Wadekar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाणीपुरी कृती बद्दल

पाणीपुरी सर्वांनाच खूप आवडते. बाहेर खाण्यापेक्षा घरी केलेली केव्हाही चांगली. एक म्हणजे भरपूर मनसोक्त खाता येते आणि दुसरे म्हणजे पोटाला आजिबात त्रास होत नाही. आणि करायलाही सोपी असल्यामुळे मी बऱ्याचदा करते. सकाळी सकाळीच माझ्या लेकीची फर्माईश आली, 'आई, आज पाणीपुरी बनव ना, खूप खावीशी वाटतेय'. मग काय, आईबाई ही खुश. बाजारातून आणलेला पुदिना फ्रीज मध्ये होताच, बटाटेही होते, चिंच, गुळ आणि पाणीपुरी मसाला तर असतोच घरी. फक्त पुऱ्या आणि शेव आणायची बाकी होती. लेक शाळेत गेल्यावर तेही आणले. कुकरमध्ये बटाटे घालून उकडायला ठेवले आणि आणि पाणीपुरी साठीचे पाणी तयार करायला घेतले तर पाणीपुरी मसाला संपलेला. आता काय करायचं? स्वतः लाच प्रश्न विचारला. उत्तरही लगेच मिळालं. अरेच्चा ! मध्यन्तरी आणलेली जलजीरा पावडर होती ना फ्रीज मध्ये, चला तर ती try करून बघुयात असे स्वतः शीच पुटपुटले आणि काम झाले. बडीशेप साठी काळे मीठ लागते तेही घरात होते. साहित्य तर सांगून झाले आता कृतीकडे वळूयात ...

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. ● पाणीपुरी पॅकेट 2
 2. ● बारीक शेव
 3. ● 2 जलजीरा पावडर
 4. ● चिंच लिंबाएवढी
 5. ● गुळ अर्धी वाटी
 6. ● पुदिना 1वाटी
 7. ● कोथिंबीर
 8. ● हिरवी मिरची 2 ते 3
 9. ● पाव लिंबाचा रस
 10. ● 2 चमचे साखर
 11. ● अर्धा चमचा काळे मीठ
 12. ● पाणी 1 ली.
 13. ● चॅट मसाला

सूचना

 1. 1. प्रथम कुकर मध्ये बटाटे उकडून घ्यावेत ,आणि नंतर स्मॅश करून ठेवावेत.
 2. 2. एका बाऊल मध्ये थोड्याशा गरम पाण्यात थोडी चिंच भिजत घालावी.
 3. 3. मिक्सरच्या छोट्या भांड्यात अंदाजे 1वाटी पुदिना, थोडी कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या (तिखट), पाव लिंबाचा रस घालून चटणी करून घ्यावी.
 4. 4. नंतर एका पातेल्यात अंदाजे एक लिटर पाणी घ्यावे.
 5. 5. त्यात हि हिरवी चटणी घालावी, भिजवलेल्या चिंचेचा कोळ घालावा, अर्धी वाटी गुळ घालावा, दोन चमचे साखर घालावी.
 6. 6. दोन चमचे जलजीरा पावडर घालावी आणि अर्धा चमचा काळे मीठ घालावे. त्यानंतर गुळ- साखर विरघळे पर्यंत हलवून घ्यावे.
 7. 7. आता ते पाणी थोडे टेस्ट करून बघावे. कसं लागतंय ... ? थोडे मिठाचे आणि जलजीरा पावडरचे प्रमाण कमी वाटले तर त्यात ते थोडे add करावे. झाले पाणीपुरीचे पाणी तय्यार !
 8. 8. आता एका डिश मध्ये पुऱ्या फोडून घ्याव्यात.
 9. 9. त्यात स्मॅश केलेला बटाटा घालावा, त्यावर पाणीपुरीचे पाणी घालावे, वर बारीक शेव घालावी, असेल तर त्यावर थोडा चाट मसाला भुभुरावा, आवडत असेल तर कोथिंबीर भुरभुरावी आणि डिश सर्व करावी.
 10. 10. आपली झटपट यापाणीपुरी तैयार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर