मुख्यपृष्ठ / पाककृती / "व्हेज सँडविच"

Photo of Veg Sandwich by Suchita Wadekar at BetterButter
211
4
0(0)
0

"व्हेज सँडविच"

Oct-18-2018
Suchita Wadekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

"व्हेज सँडविच" कृती बद्दल

व्हेज सँडविच करायला सोपे आणि हेल्दी डिश आहे. मुलांपासून सर्वांच्याच आवडीची. याला लागणारे निम्मे साहित्य( काकडी, टोमॅटो, टोमॅटो सॉस) तर घरी असतेच प्रत्येकाच्या, फक्त ब्रेड, बटर आणि चीझ स्लाईज आणले की झाले. तयारीला 10 ते15 मिनिटे लागतात मात्र चविष्ट आणि पौष्टीक डिश आहे. पोट तर भरतेच परंतु मनही अगदी तृप्त होते. सँडविच म्हटले की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. बघा, फोटो पाहून तुम्हालाही पटतंय ना माझं म्हणणं, मग उशीर करू नका, पटकन कामाला लागा आणि झटपट बनवा "व्हेज सँडविच".

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. ● सँडविच ब्रेड 1
 2. ● अमूल बटर 1 पॅकेट
 3. ● चीझ स्लाईज 2 पॅकेट
 4. ● काकडी 2
 5. ● टोमॅटो 2
 6. ● पुदिना 1 वाटी
 7. ● हिरवी मिर्ची 2
 8. ● मीठ आवश्यकतेनुसार
 9. ● टोमॅटो सॉस अर्धी वाटी

सूचना

 1. प्रथम ब्रेडच्या स्लाईजच्या कडा कात्रीने कापून घ्या.
 2. काकडी साले काढून त्याचे स्लाईज करून घ्या.
 3. टोमॅटोचे स्लाईज करून घ्या.
 4. पुदिना, हिरवी मिरचीची मीठ घालून हिरवी चटणी करून घ्या.
 5. टोमॅटो सॉस, बटर, चीझ स्लाईज तयार ठेवा.
 6. ब्रेडच्या कडा काढलेल्या चार स्लीईज एका ताटात घ्या. एका स्लाईज ला हिरवी चटणी, दुसरीला टोमॅटो सॉस, बाकी दोन्हीला बटर लावून घ्या.
 7. हिरवी चटणी लावलेल्या स्लाईज वर टोमॅटो स्लाईज पसरून ठेवा. त्यावर टोमॅटो सॉस लावलेली स्लाईज पालथी ठेवा.
 8. आता स्लाईज च्या वरील भागावर टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी असे दोन्ही लावा आणि त्यावर काकडीचे स्लाईज ठेऊन द्या.
 9. आता यावर दोन्ही बाजूने बटर लावलेली स्लाईज ठेऊन त्यावर चीझ स्लाईज ठेवा व वरून पुन्हा बटर लावलेली स्लाईज ठेवा.
 10. आता या सँडविचला क्रॉस × या आकारात कट करा
 11. एका सँडविचचे चार भाग होतील
 12. टोमॅटो सॉस ने सजवून सर्व्ह करा "व्हेज सँडविच"

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर