मुख्यपृष्ठ / पाककृती / कोटेड छोले फ्राय

Photo of Koted choole fry by Ujwala Surwade at BetterButter
673
1
0.0(0)
0

कोटेड छोले फ्राय

Oct-19-2018
Ujwala Surwade
480 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोटेड छोले फ्राय कृती बद्दल

छोल्यांना स्वतः ची काही चव नसते. पण छोले भटुरे ,छोले मसाला अस तर आपल्याला खायला आवडतं. रव्याचे आणि बेसनाचे कोटिंग करून छोले तळले .छान झाले.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी छोले
  2. आल -लसूण पेस्ट
  3. हींग
  4. हळद
  5. लाल तिखट
  6. धनेपूड
  7. मीठ
  8. गरम मसाला
  9. बारीक रवा
  10. बेसनपीठ
  11. पाणी
  12. तमालपत्र
  13. चिमूटभर खायचा सोडा

सूचना

  1. प्रथम छोले धुऊन भिजत घाला
  2. भिजवतांना एक तमालपत्र टाका
  3. ७ते८ तास भिजले की सोडा घालून कुकरला लावा.कुकर गार झाले की छोले काढून घ्या
  4. नंतर त्यात आल लसूण पेस्ट तिखट मीठ
  5. हळद हिंग गरम मसाला रवा बेसनपीठ घालून मिक्स करून १०मिनिटं बाजूला ठेवा
  6. गरज वाटल्यास किंचित पाण्याचा हात लावावा जेणेकरून कोटींग नीट होईल
  7. नंतर कढईत तेल तापत ठेवून छोले छान कुरकुरीत तळून घ्यावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर