मुख्यपृष्ठ / पाककृती / ओली भेळ

Photo of Bhel .... by Suchita Wadekar at BetterButter
1
1
0(0)
0

ओली भेळ

Oct-19-2018
Suchita Wadekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओली भेळ कृती बद्दल

भेळ तशी सर्वांच्याच आवडीची आणि करायलाही सोपी असल्यामुळे पटकन करता येते. बऱ्याचदा सर्व साहित्य घरी असतेच. ज्यांची मुले लहान आहेत त्यांना हा अनुभव असेल. संध्याकाळच्या वेळी मुलं शाळेतून आल्यावर भूक भूक करतात तेव्हा काय करू हा बऱ्याच गृहिणींना प्रश्न पडतो अशावेळी सर्व साहित्य असेल तर पटकन भेळ करता येते. मुलं हि खुश आणि पतीदेखील खुश!

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

 1. ● फरसाण पाव किलो
 2. ● मुरमुरे 1पॅकेट
 3. ● चिंचेचे आंबटगोड पाणी 1 वाटी
 4. ● कोथिंबीर + हिरवी मिरचीची हिरवी चटणी
 5. ● कैरी
 6. ● कांदा 2
 7. ● कोथिंबीर
 8. ● टोमॅटो
 9. ● खारे दाणे
 10. ● बारीक शेव

सूचना

 1. प्रथम कांदा, कोथिंबीर, टोमॅटो बारीक चिरून घ्या.
 2. चिंचेचा कोळ काढून त्यात गूळ, लालतिखट, थोडे मीठ घालून गॅसवर दोन तीन उकळी आणावी. अशा प्रकारे चिंचेची आंबट गोड चटणी बनवून घ्या.
 3. हिरवी मिरची व कोथिंबिरीची हिरवी चटणी करून घ्या.
 4. एका मोठ्या पातेल्यात मुरमुरे, फरसाण, कांदा, टोमॅटो, हिरवी चटणी, चिंचेची चटणी घालून भराभर एका चमच्याने मिक्स करा.
 5. तयार झालेले मिश्रण डिश मध्ये काढून घ्या, त्यावर थोडा कांदा, टोमॅटो, कैरी, खारे शेंगदाणे, शेव आणि वरून कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. "ओळी चटकदार भेळ".

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर