मुख्यपृष्ठ / पाककृती / रगडा पॅटिस

Photo of Ragda Pattice by Sanika SN at BetterButter
1375
3
0.0(0)
0

रगडा पॅटिस

Oct-19-2018
Sanika SN
420 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रगडा पॅटिस कृती बद्दल

चटपटीत व पोटभरीचे चाट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ मोठी वाटी पांढरे वाटाणे स्वच्छ धुवून ६-७ तास भिजवून ठेवणे.
  2. १/४ टीस्पून हिंग
  3. १/२ टेस्पून हळद
  4. १-१/२ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
  5. १ टीस्पून काळा मसाला
  6. मीठ चवीनुसार
  7. १ टीस्पून चिंचेचा कोळ
  8. साहित्य पॅटिससाठी:
  9. ४-५ बटाटे उकडून, सोलून, किसून घ्या म्हणजे पॅटिस करताना गुठळ्या राहणार नाही.
  10. २ टेस्पून आले+ लसूण+ हिरवी मिरची वाटून (तुम्ही पेस्ट वापरु शकता, मला भरडसर वाटलेले आवडते म्हणून तसे घेतले आहे)
  11. १/२ टीस्पून हळद
  12. १/४ टीस्पून चाट मसाला
  13. मीठ चवीनुसार
  14. मैदा / काॅर्नफ्लोर बाईंडिंगसाठी
  15. साहित्य सर्व्हिंगसाठी:
  16. बारीक चिरलेला कांदा
  17. बारीक चिरलेली कोथींबीर
  18. चाट मसाला
  19. चिंच-खजुराची चटणी
  20. पुदिन्याची चटणी
  21. वरुन घालायला शेव/ फरसाण 

सूचना

  1. साहित्य रगडा
  2. साहित्य पॅटिस
  3. साहित्य सर्व्हिंग
  4. पांढरे वाटाणे हिंग व हळद घालून कुकरला मऊसर शिजवून घ्या.
  5. पातेल्यात तेल गरम करुन त्यात शिजवलेले वाटाणे, लाल तिखट, काळा मसाला, मीठ, चिंचेचा कोळा व थोडेच पाणी घालून उकळी आणा.
  6. रगडा नीट शिजला की गॅस बंद करा. (आवडत असल्यास फोडणीत चमचाभर आले+लसूण पेस्ट परता)
  7. बटाट्याच्या मिश्रणात वाटलेले आले+ लसूण+ हिरवी मिरची, हळद, चाट मसाला, मीठ व मैदा घालून चांगले मिक्स करावे.
  8. मिश्रणाचे छोटे गोळे घेऊन चपटे करुन पॅटिस तयार करावे.
  9. नॉन-स्टिक तव्यावर तेल घालून पॅटिस दोन्ही बाजूंनी खमंग शॅलो फ्राय करावे.
  10. एका प्लेटमध्ये रगडा घालून घ्या त्यावर तयार पॅटिस ठेवावे.
  11. आता त्यावर पुदिन्याची चटणी व चिंच-खजुराची चटणी घालावी.
  12. वरुन चिरलेला कांदा व कोथींबीर घालावी.
  13. वरुन शेव/ फरसाणने गार्निश करुन सर्व्ह करावे.
  14. रगडा पॅटिस खाण्यासाठी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर