Photo of Batate Vade by Manisha Lande at BetterButter
540
1
0.0(0)
0

बटाटे वडे

Oct-19-2018
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटे वडे कृती बद्दल

लहानांपासुन मोठयांपर्यंत सर्वांना आवडणारा एक चमचमीत चटकदार चविष्ट असा ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. सारण साहित्य :
  2. ४ मोठे उकडलेले बटाटे
  3. २ मोठे बारीक चिरलेले कांदे
  4. १ मोठा चमचा आलं-लसुण पेस्ट
  5. ४ ते ५ मोठ्या हिरव्या मिरच्या
  6. १ छोटा चमचा हळद
  7. १/२ छोटा चमचा जिरं
  8. १/२ छोटा चमचा मोहरी / राई
  9. १/४ छोटा चमचा हिंग
  10. चवीनुसार मीठ
  11. तेल
  12. बाहेरचे आवरण साहित्य :
  13. १ वाटी बेसन / चण्याचे पीठ
  14. १ छोटा चमचा लाल तिखट
  15. १/२ छोटा चमचा हळद
  16. १/४ छोटा चमचा हिंग
  17. १/४ छोटा चमचा ओवा
  18. चवीनुसार मीठ
  19. तेल

सूचना

  1. सारण कृती :
  2. प्रथम उकडलेल्या बटाट्याचे छोटे तुकडे करून घेतले.
  3. नंतर त्याला आलं-लसुण पेस्ट, हळद, व चवीनुसार मीठ घालून छान एकजीव करून लावलं.
  4. नंतर कढईत तेल गरम करत ठेवले तेल तापल्यावर त्यात जिरं, मोहोरी, हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन, हिंग, व कढीपत्याची पानं घालुन थोडं परतलं.
  5. फोडणी छान तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेले कांदे घालून ते सोनेरी रंगावर छान भाजून घेतले.
  6. नंतर त्यात हळद, मीठ, आलं-लसुण पेस्ट लावलेलं बटाटयाचे मिश्रण घालून छान परतून एकजीव करून घेतले व बाजूला ठेवले.
  7. नंतर बेसन पीठात हळद, ओवा, लाल तिखट, हिंग, व थोडं थोडं पाणी घालुन सरसरीत बॅटर करून घेतलं
  8. नंतर भाजीचे मिश्रण मॅश करुन त्याचे मध्यम आकाराचे गोळे करून घेतले.
  9. नंतर कढईत वडे तळायला तेल गरम करत ठेवले.
  10. तेल गरम झाल्यावर त्यात बनविलेले बटाट्याचे गोळे बेसन पीठात घोळवून गरम तेलात सोडून वडे छान सोनेरी रंगावर खमंग तळून घेतले.
  11. गरमागरम तयार बटाटे वडे सर्व्हींग डिशमध्ये काढून लादी पाव, हिरवी मिरची, व हिरव्या चटणीसोबत सर्व्ह केले.
  12. गरमागरम "बटाटे वडे" तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर