मुख्यपृष्ठ / पाककृती / राम लड्डू चाट

Photo of Ram Ladoo Chaat by Sanika SN at BetterButter
833
3
0.0(0)
0

राम लड्डू चाट

Oct-19-2018
Sanika SN
360 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राम लड्डू चाट कृती बद्दल

पौष्टिक व चटकदार चाट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • नॉर्थ इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ५-६ तास भिजवलेली १ वाटी पिवळी मुगाची डाळ
  2. ५-६ तास भिजवलेली १/२ वाटी चणा डाळ
  3. १ बारीक चिरलेली हिरवी मिरची
  4. बारीक चिरलेली कोथींबीर
  5. चवीनुसार मीठ
  6. पुदिना चटणी साहित्य
  7. मुठभर कोथींबीर
  8. मुठभर पुदीना
  9. १ बारीक चिरलेली हिरवी मिरची (आवडी प्रमाणे कमी-जास्त)
  10. १/२ टीस्पून जीरे
  11. १ टीस्पून लिंबाचा रस
  12. १/२ टीस्पून साखर
  13. मीठ चवीनुसार

सूचना

  1. साहित्य राम लड्डू
  2. साहित्य पुदिना चटणी
  3. चटणीचे सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरवर वाटून चटणी तयार करून घ्यावी.
  4. भिजवलेल्या डाळींतून सर्व पाणी काढून, निथळून घ्यावे.
  5. दोन्ही डाळ एकत्र करून,मिक्सरवर पाणी अजिबात न घालता बारीक वाटून घ्यावे.
  6. वाटलेले डाळींचे मिश्रण एका भांड्यात काढून ते हलके व पांढरे होईपर्यंत फेटावे. (साधारण ५-७ मिनिटे लागतात)
  7. आता फेटलेल्या डाळींच्या मिश्रणात चवीनुसार मीठ,चिरलेली हिरवी मिरची व चिरलेली कोथींबीर घालून एकत्र करावे.
  8. कढईत तेल मंद आचेवर तापत ठेवावे.
  9. तापलेल्या तेलात हाताने मिश्रण घेऊन गोलाकार भजी सोडावी.
  10. मिश्रण हलके झाल्यामुळे तेलात सोडताच भजी वर तरंगू लागेल.
  11. मंद आचेवर सर्व राम लड्डू सोनेरी रंगावर तळून घावे.
  12. सर्व्हींगः
  13. एका ताटात किंवा द्रोणात तयार राम लड्डू रचून ठेवावे.
  14. त्यावर पुदीन्याची चटणी घालावी.
  15. त्यावर किसलेला कच्चा मुळा व थोडी कोथींबीर घालावी. 
  16. तयार राम लड्डू चाट.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर