मुख्यपृष्ठ / पाककृती / तर्रीदार झणझणीत चटकदार मिसळ पाव

Photo of Misal Pav by Manisha Lande at BetterButter
1058
1
0.0(0)
0

तर्रीदार झणझणीत चटकदार मिसळ पाव

Oct-20-2018
Manisha Lande
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तर्रीदार झणझणीत चटकदार मिसळ पाव कृती बद्दल

महाराष्ट्रातील ट्रेडिशनल अशी ही डिश आहे जी आता जगभर प्रसिद्ध झाली आहे. झणझणीत चटकदार अस्सल मराठमोळा हा पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी मोड आलेली मटकी
  2. २ मोठे उभे चिरलेला कांदे
  3. १ मोठा बारीक चिरलेला टोमॅटो
  4. १/४ वाटी खवलेला ओला नारळ
  5. १ छोटा तुकडा आलं
  6. ५ ते ६ लसुण पाकळ्या
  7. १ मोठा चमचा लाल तिखट
  8. १छोटा चमचा हळद
  9. १ छोटा चमचा धने-जीरे पुड
  10. १ छोटा चमचा किचन किंग मसाला
  11. १/४ छोटा चमचा कांदा-लसुण मसाला
  12. १ छोटा तुकडा गुळ
  13. गरम पाणी
  14. चवीनुसार मीठ
  15. तेल
  16. फरसाण आवडीनुसार
  17. १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
  18. १ बारीक चिरलेला कांदा
  19. लिंबू
  20. लादी पाव

सूचना

  1. प्रथम प्रेशर कुकर मध्ये मोड आलेली मटकी, हळद, व थोडं मीठ व मटकी बुडेल इतकं पाणी घालुन १ शिट्टी काढून मटकी शिजवून घेतली.
  2. कढईत खवलेलं ओलं खोबरं घालून लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतलं व बाजूला ठेवले.
  3. कढईत थोडसं तेल गरम करून त्यात लसूण पाकळ्या, आल्याचे बारीक तुकडे करून व उभे चिरलेले कांदे घालून ते सर्व सोनेरी रंगावर छान भाजून घेतलं.
  4. नंतर कांद्याच्या मिश्रणात बारीक चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतला.
  5. नंतर भाजलेलं ओलं खोबरं व कांदा-टोमॅटोचे मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट वाटून घेतली.
  6. कढईत तेल गरम करून त्यात वाटलेली पेस्ट घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली.
  7. नंतर त्यात लाल तिखट, किचन किंग मसाला, कांदा-लसुण मसाला, धने-जीरे पुड घालून सर्व मसाले व वाटलेली पेस्टबरोबर छान तेल सुटेपर्यंत एकजीव करून परतले.
  8. नंतर त्यात शिजवलेली मटकी पाण्यासकट मसाल्याच्या मिश्रणात घातली.
  9. नंतर त्यात चवीनुसार मीठ व गुळाचा बारीक तुकडा घालून मध्यम आचेवर छान ऊकळी येईपर्यंत ७ ते ८ मिनिटे छान तर्रीदार कट येईपर्यंत शिजवून घेतली.
  10. तयार मिसळ सर्व्हींग डिशमध्ये काढून फरसाण, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाची फोड व लादी पाव बरोबर गरमागरम सर्व्ह केली.
  11. "तर्रीदार झणझणीत चटकदार मिसळ पाव" खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर