मुख्यपृष्ठ / पाककृती / मेदू वडा सांबर (उडीद वडा)

Photo of Medu Vada Sanbar by SUCHITA WADEKAR at BetterButter
802
1
0.0(0)
0

मेदू वडा सांबर (उडीद वडा)

Oct-22-2018
SUCHITA WADEKAR
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेदू वडा सांबर (उडीद वडा) कृती बद्दल

हि दक्षिणेकडील डिश आहे, परंतु महाराष्ट्रात सर्व ठिकाणी केली जाते. सगळी तयारी असेल तर अगदी दहा मिनिटात होते हि डिश. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच अतिशय आवडती डिश आहे. मुले भाज्या खात नाहीत अशावेळी सांबर मध्ये विविध भाज्या उदा. फ्लॉवर, दुधी भोपळा, बटाटा, वांगे, पालक आदी भाज्या वापरून सांबर बनवता येते. अतिशय पौष्टीक डिश आहे.

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • साऊथ इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ● उडीद डाळ 2 वाटी
  2. ● तांदूळ अर्धी वाटी
  3. ● हरभरा डाळ पाव वाटी
  4. ● हिरवी मिरची 4-5
  5. ● आले 1 इंच
  6. ● जिरे 1 चमचा
  7. ● मीठ आवश्यकतेनुसार
  8. ● तळण्यासाठी तेल
  9. ★ सांबर साठी ---
  10. ● तूरडाळ 1 वाटी
  11. ● मसूर डाळ पाव वाटी
  12. ● हिंग अर्धा चमचा
  13. ● हळद एक चमचा
  14. ● कांदा 1
  15. ● बटाटा 1
  16. ● टोमॅटो 1
  17. ● सांबर मसाला 1 मोठा चमचा
  18. ● लाल तिखट 1 चमचा
  19. ● मीठ आवश्यकतेनुसार
  20. ★ फोडणी साठी ---
  21. ● तेल 2 चमचे
  22. ● जिरे 1 चमचा छोटा
  23. ● मोहरी 1 चमचा छोटा
  24. ● कढीपत्ता

सूचना

  1. प्रथम उडीद डाळ, तांदूळ आणि हरभरा डाळ चार तास भिजत घालावी.
  2. चार तासानंतर सर्व डाळी मिक्सरला वाटून घ्याव्यात.
  3. यानंतर हिरवी मिरची, जिरे,आले थोडे मीठ घालून मिक्सरला बारीक करून घ्यावे.
  4. हे वाटलेले वाटण, कोथिंबीर आणि आवश्यक मीठ उडीद डाळीच्या वाटलेल्या बॅटर मध्ये घालून चांगले मिक्स करावे.
  5. दुसरीकडे गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे.
  6. तेल तापल्यावर त्यातील 2 चमचे तेल उडीद डाळीच्या बॅटर मध्ये घालावे आणि मिक्स करावे.
  7. एक एक करून तापलेल्या तेलात वडे सोडावेत आणि मंद गॅस वर वडे खरपूस तळावेत.
  8. सांबर सोबत सर्व्ह करावेत. आपले उडीद वडे तैयार !
  9. ★ सांबर -- प्रथम सर्व डाळी कुकरला हिंग , हळद घालून शिजवून घ्याव्यात.
  10. शिजवलेली डाळ रवीने हटून घ्यावी.
  11. एका पातेल्यात फोडणी साठी तेल गरम करावे, त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून कांदा बटाटा घालवा आणि थोडे परतून झाकण ठेवावे.
  12. तीन मिनिटांनी झाकण उघडून त्यात सांबर मसाला आणि लालतिखट घालावे आणि परतावे.
  13. नंतर यात हटलेली डाळ घालावी आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मीठ घालावे. वरून कोथिंबीर घालावी.
  14. दोन-तीन उकळी येऊ द्याव्यात, आपले सांबर तैय्यार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर