Photo of Alu wadi by Manisha Lande at BetterButter
893
1
0.0(0)
0

अळुवडी

Oct-22-2018
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळुवडी कृती बद्दल

अळुवडी आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक आणि जगभरात प्रसिद्ध असलेला चविष्ट आणि चमचमीत पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. अळूच्या पानांची जुडी
  2. २ वाटी बेसन / चण्याचे पीठ
  3. १ मोठा चमचा तांदूळ पीठ
  4. १/४ वाटी चिंचेचा कोळ
  5. १ मोठा चमचा लाल तिखट
  6. १ छोटा चमचा हळद
  7. १/४ छोटा चमचा चाट मसाला
  8. १ छोटा चमचा धने-जीरे पुड
  9. १/४ छोटा चमचा हिंग
  10. १ छोटा गुळाचा तुकडा
  11. चवीनुसार मीठ
  12. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. प्रथम अळुची पानं ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घेतली.
  2. एका भांड्यात बेसन, तांदूळ पीठ घालून एकजीव करून घेतले.
  3. नंतर त्यात लाल तिखट, हळद, धने-जीरे पुड, चाट मसाला, हिंग व थोडं थोडं पाणी घालुन सरसरीत बॅटर करून घेतले.
  4. नंतर त्यात ( आवडीनुसार जितकं आंबट हवं ) चिंचेचा कोळ, गुळाचा तुकडा व चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतले.
  5. स्वच्छ केलेलं अळुचे पान उलटं ठेवून त्यावर तयार बेसन पीठ सर्व बाजूंनी लावून घेतलं.
  6. नंतर पुन्हा त्यावर दुसरं अळुचे पान उलटं ठेवून त्यावरसुद्धा बेसन पीठ सर्व बाजूंनी लावून घेतलं.
  7. अळुची पानं संपेपर्यंत हि स्टेप रिपीट करून अळूच्या पानांना दुमडुन त्याचा रोल करुन घेतला.
  8. प्रेशर कुकरच्या भांड्याला सर्व बाजूंनी तेलाने ग्रिसिंग करून त्यात अळूच्या पानांचा रोल ठेवून ते भांडे प्रेशर कुकर मध्ये ठेवून कुकरची शिट्टी काढून मोठ्या आचेवर १५ मिनिटे शिजवून घेतला.
  9. शिजवलेल्या अळूच्या पानांचा रोलच्या मध्यम आकाराच्या वड्या कापुन घेतल्या.
  10. कढईत तेल गरम त्यात अळुवडया छान सोनेरी रंगावर खमंग तळून घेतल्या.
  11. तयार अळुवड्या सर्व्हींग डिशमध्ये काढून गरमागरम सर्व्ह केल्या.
  12. गरमागरम "अळुवडी" खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर