मुख्यपृष्ठ / पाककृती / हनी-चिली पोटॅटोज

Photo of Honey Chilli Potatoes by Sanika SN at BetterButter
710
3
0.0(0)
0

हनी-चिली पोटॅटोज

Oct-22-2018
Sanika SN
59 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हनी-चिली पोटॅटोज कृती बद्दल

चटपटीत इंडो- चायनीज पाककृती

रेसपी टैग

  • चायनीज
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. २ ते ३ बटाटे सालं काढून, उभे -लांब चिरुन घेणे (फ्रेंच फ्राईजप्रमाणे)
  2. १ टेस्पून बारीक चिरलेला लसूण
  3. १-१/२ टेस्पून टोमॅटो सॉस
  4. १ टीस्पून चिली फ्लेक्स (नसल्यास लाल तिखट वापरु शकता आवडीप्रमाणे कमी-जास्त)
  5. थोडेसे मीठ
  6. १ टीस्पून तेल
  7. साहित्य सॉसः
  8. १ टेस्पून डार्क सोया सॉस
  9. १ टेस्पून टोमॅटो सॉस
  10. १-१/२ टेस्पून मध
  11. १ टीस्पून बारीक चिरलेला लसूण
  12. १/२ टीस्पून पांढरी मिरपूड
  13. १-१/२ टीस्पून तीळ
  14. कांद्याची पात बारीक चिरून
  15. मीठ चवीनुसार (सॉसमध्ये ही मीठ असतं, तसेच बटाट्यांमध्ये ही घातलं होतं)
  16. तेल

सूचना

  1. साहित्य
  2. साहित्य साॅस
  3. एका रिक्लोझेबल बॅगमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करुन हलवून मिक्स करुन घेणे. (भांड्यात ही एकत्र करुन घेऊ शकता)
  4. ओव्हन २०० डिग्री सें वर प्री-हीट करुन घेणे.
  5. बेकिंग ट्रेवर व्हॅक्स पेपर लावून किंवा तेलाने ग्रीज करुन घेणे.
  6. त्यावर बटाट्याचे उभे काप सर्वत्र पसरवून घेणे.
  7. २०० डिग्री सें वर ३०- ३५ मिनिटे बेक करणे (मधे एकदा बटाटे उलटवून ठेवणे)
  8. नोटः ज्यांच्याकडे ओव्हन नाही ते डीप फ्राय करु शकतात, फक्त त्यात मग बटाट्यांना तेल लावू नये.
  9. एका पॅनमध्ये तेल गरम करुन लसूण परतून घ्या.
  10. लसूण चांगला परतला गेला की त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, मध, मिरपूड व मीठ घाला.
  11. त्यात बेक केलेले बटाटे घालून सगळं मिक्स करा.
  12. आता त्यात कांद्याची पात व तीळ घालून एकत्र करा.
  13. तयार हवी चिली पोटॅटोज

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर