BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बेक्ड ब्रेड रोल्स

Photo of Baked Bread Rolls by Sanika SN at BetterButter
0
2
0(0)
0

बेक्ड ब्रेड रोल्स

Oct-22-2018
Sanika SN
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेक्ड ब्रेड रोल्स कृती बद्दल

भाज्या घालून केलेले ब्रेड रोल्स

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • नॉर्थ इंडियन
 • बेकिंग
 • सौटेइंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. ७-८ ब्राऊन ब्रेड स्लाईसेस (तुम्ही पांढरा ब्रेड ही वापरु शकता)
 2. २-३ छोटे बटाटे सालं काढून, तुकडे करुन घेतलेले
 3. १ गाजर साल काढून, तुकडे केलेले
 4. १/२ वाटी बारीक चिरलेली फरसबी
 5. १/२ वाटी मटारचे दाणे
 6. १ छोटा कांदा बारीक चिरलेला
 7. बारीक चिरलेली कोथींबीर
 8. मीठ चवीनुसार
 9. १ टेस्पून किसलेले आले
 10. १/२ टीस्पून जीरे
 11. १ टीस्पून लाल तिखट
 12. १ टीस्पून धणेपूड
 13. १-१/२ टीस्पून गरम मसाला

सूचना

 1. साहित्य
 2. पॅनमध्ये तेल गरम करुन जीर्‍याची फोडणी करुन घ्यावी.
 3. त्यात किसलेले आले घालून परतावे.
 4. कांदा घालून मऊसर परतून घ्यावा.
 5. सगळ्या भाज्या, मीठ व मसाले घालून , एकत्र करुन, झाकून ८-१० मिनिटे शिजवून घेणे.
 6. भाजी शिजली की वरुन कोथींबीर पेरावी .
 7. भाजी पूर्ण गार होऊ द्यावी.
 8. ब्रेड स्लाईसच्या कडा कापून घ्याव्यात व लाटण्याने हलके लाटून घ्यावे.
 9. ओलसर रुमाल किंवा किचन पेपर टॉवेल त्यावर ठेवून १० मिनिटे बाजूला ठेवावे.
 10. १० मिनिटानंतर ब्रेड स्लाईसवर भाजीचे सारण ठेवून ब्रेड रोल करुन घ्यावा व त्याच्या कडा घट्ट बंद करुन घ्याव्यात.
 11. ओव्हन २०० डिग्रीवर १० मिनिटे प्री-हीट करुन घ्या.
 12. बेकिंग ट्रेवर रोल ठेवून त्यावर थोडे बटर ब्रश करुन घ्यावे व २०० डिग्री सें वर १०-१५ मिनिटे ब्रेड रोल हलक्या सोनेरी रंगावर, कुरकुरीत बेक करुन घ्यावे.
 13. गरमा-गरम ब्रेड रोल्स टोमॅटो केचपबरोबर किंवा तुमच्या आवडत्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर