Photo of Bread roll by Nivedita Walimbe at BetterButter
1065
1
0.0(0)
0

ब्रेड रोल

Oct-23-2018
Nivedita Walimbe
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड रोल कृती बद्दल

अतिशय स्वादिष्ट पदार्थ. स्नॅक्स म्हणून केव्हाही खाऊ शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. उकडलेले मध्यम बटाटे चार
  2. आलेअगदी थोडे , लसूणआठ ते दहा पाकळ्या,मिरच्या दोन यांची पेस्ट
  3. मीठ, साखर चवीनुसार
  4. ब्रेड दहा - पंधरा स्लाइस
  5. कोथिंबीर
  6. गोड घट्ट दही दोन वाट्या
  7. दह्यात थोडे मीठ व साखर घालून फेटून ठेवणे
  8. तेल तळणीसाठी

सूचना

  1. बटाटे कुस्करून घ्यावे
  2. त्यात आले, लसूण, मिरची पेस्ट घालावी.
  3. मीठ, साखर चवीनुसार घालावे.
  4. कोथिंबीर घालावी
  5. हे सर्व नीट मळून घ्यावे
  6. त्याचे छोटे गोळे करून घ्यावेत
  7. ब्रेड स्लाइसला थोडेसे पाणी लावून ओलसर करून घ्यावी
  8. त्यात वर करून घेतलेला बटाटा गोळा घालून व्यवस्थित रोल करून घ्यावेत
  9. तेल गरम करून घ्यावे
  10. तेलामध्ये एक एक करून रोल तळून घ्यावेत
  11. गोड दह्याबरोबर सर्व्ह करावेत
  12. खूप स्वादिष्ट होतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर