मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर वडी

Photo of KOTHIMBIR VADI by Deepa Gad at BetterButter
547
4
0.0(0)
0

कोथिंबीर वडी

Oct-24-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर वडी कृती बद्दल

मी दरवेळेला स्नॅक्स म्हणून कोथिंबीर वडी वाफवून करते पण आज दुसऱ्या पद्धतीने पहिल्यांदाच केली, छानच चवीला झाली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन १ मोठी वाटी
  2. कोथिंबीर १ वाटी चिरलेली
  3. धने पावडर २ च
  4. जिरे पावडर १ च
  5. हिरवी मिरचीची पेस्ट २ च
  6. हळद अर्धा च
  7. तिखट १ च
  8. भिजवलेले शेंगदाणे २ च
  9. तेल तळण्याकरिता
  10. मीठ चवीनुसार
  11. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. कोथिंबीर, कांदा, चिरून घ्या
  2. बेसन, धनेजिरे पावडर, तिखट, हळद, मिरची पेस्ट, मीठ, हे सर्व एका भांड्यात घ्या
  3. त्यात पाणी घालून थोडं घट्ट बॅटर बनवा
  4. कढईत तेलात कांदा परतून मग कोथिंबीर घालून थोडं परता
  5. त्यावर तयार बॅटर घालून सतत ढवळत राहा
  6. मिश्रण शिजून आळत आलं की गॅस बंद करा
  7. ताटाला तेल लावून त्यात हे मिश्रण थापा व वड्या पाडा
  8. कढईत तेल घेऊन वड्या खरपूस तळून घ्या, हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर गरमागरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर