Photo of Mini meduvada toss by deepali oak at BetterButter
338
6
5.0(1)
0

Mini meduvada toss

Oct-24-2018
deepali oak
45 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ऊडीदडाळ दोन मोठ्ठी वाटी
  2. चणाडाळ पाव वाटी
  3. ओले खोबरे पातळ तुकडे १०-१२
  4. आले व लसूण पेस्ट दोन चमचे
  5. कांदा एक मोठा बारीकसा चीरून
  6. टोमॅटोपण एक मोठा चीरून
  7. कढीपत्ता चार पाच पाने
  8. कोथिंबीर पाव पाटी
  9. सांबार मसाला दोन चमचे
  10. हिंग व हळद चीमुटभर
  11. तिखट एक चमचा
  12. मीरच्या दोन ते तिन
  13. तळणीसाठी व फोडणीसाठी तेल
  14. जीरे व मोहरी एक लहान चमचा
  15. मीठ चवीनुसार
  16. पाणी एक वाटी

सूचना

  1. चणाडाळ व ऊडीदडाळ अर्धातास पाण्यात भीजत ठेवावी
  2. डाळी छान भीजल्या कि स्वच्छ धुवावीत
  3. मीक्सरला कमी पाणी घालून डाळी वाटुन घ्या
  4. डाळी वाटत असताना त्यात मिरचीचे तुकडे वाटुन घ्या
  5. आता ह्यामध्ये नारळाचे तुकडे व आले लसुण पेस्ट एक चमचा आणि मीठ घालून मीश्रण ढवळुन घ्या
  6. आता ह्याचे लहान आकाराचे मेदुवडे तयार करा
  7. एक एक लहान वडे गरम तेलात सोडुन लालसर रंगात तळुन घ्या
  8. सगळे वडे तयार करून घ्या
  9. आता दुसर्‍या कढईत जरासे तेल तापत ठेवा
  10. त्या तेलात जीरे व मोहरी व कढीपत्ता घाला
  11. कांदा व टोमॅटोपण घाला व आलेलसुण पेस्ट घाला
  12. आता तिखट हिंग व हळद घालून मीक्स करा
  13. आता सांबार मसाला घाला व जरासे पाणी शिंपडा.
  14. पाणी आटले व सांबार मसाल्यांचा सुवास दरवळला कि आपले तयार मीनी मेदुवडे ह्या मसाल्यांत टाॅस करा
  15. वरून कोथिंबीर घालून तयार तुमचे मीनी मेदुवडा टाॅस

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Oct-25-2018
samina shaikh   Oct-25-2018

छान आणि वेगळी डिश :ok_hand:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर