मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रिस्पी बटाटा पोहा टिक्की

Photo of Crispy Batata Poha Tikki by Manisha Lande at BetterButter
748
2
0.0(0)
0

क्रिस्पी बटाटा पोहा टिक्की

Oct-24-2018
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रिस्पी बटाटा पोहा टिक्की कृती बद्दल

चविष्ट स्नॅक लहान मुलांना व मोठ्याना छोट्या छोट्या भुकेला द्यायला एक उत्तम पर्याय आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. ४ ऊकडलेले बटाटे
  2. १वाटी भिजवलेले जाडे पोहे
  3. १ वाटी उकडलेले मटार दाणे
  4. १/२ वाटी किसलेलं गाजर
  5. १ मोठा चमचा लाल तिखट
  6. १/२ छोटा चमचा हळद
  7. १/४ छोटा चमचा जिरं
  8. १/४ छोटा चमचा चाट मसाला
  9. १/२ लिंबू रस
  10. १ मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर
  11. १ मोठा चमचा बारीक रवा
  12. चवीनुसार मीठ
  13. तेल

सूचना

  1. प्रथम एका पसरट भांड्यात उकडलेले बटाटे, भिजवलेले जाडे पोहे, उकडलेले मटार दाणे, किसलेलं गाजर, घालून हाताने सर्व मॅश करून एकजीव करून घेतले.
  2. नंतर त्यात लाल तिखट, हळद, जिरं, चाट मसाला, कॉर्नफ्लॉवर, लिंबू रस, व चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण छान एकजीव करून घेतले.
  3. नंतर मिश्रणाच्या मध्यम आकाराच्या टिक्की बनवून थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवल्या.
  4. गॅसवर तवा गरम करायला ठेवुन गरम झाल्यावर त्यात १ मोठा चमचा तेल घालुन ते गरम करायला ठेवले.
  5. तयार टिक्की रव्यामध्ये घोळवून गरम तेलावर टिक्की ठेवून दोन्ही बाजूंनी छान खमंग व खरपूस भाजून घेतल्या.
  6. गरमागरम "बटाटा पोहा टिक्की" सर्व्हींग डिशमध्ये काढून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह केल्या.
  7. "बटाटा पोहा टिक्की" खायला तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर