मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन तंदुरी

Photo of Chicken Tandoori by Sanika SN at BetterButter
951
2
0.0(0)
0

चिकन तंदुरी

Oct-25-2018
Sanika SN
720 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन तंदुरी कृती बद्दल

चमचमीत चिकन तंदुरी

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • बेकिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. ५०० ग्राम चिकन लेग आणि थाय पिसेस
  2. ३-४ टेस्पून दही
  3. २-३ लसूण पाकळ्या
  4. १ इंच आले
  5. २ टेस्पून कोथींबीर
  6. २ टेस्पून पुदिन्याची पाने
  7. २ टेस्पून तंदुरी मसाला
  8. रंगासाठी दीड टेस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर आवडीप्रमाणे
  9. १/२ टीस्पून काळिमिरीपूड
  10. १ टेस्पून गरम मसाला
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. साहित्य
  2. आले, लसूण, कोथींबीर व पुदिना एकत्र वाटुन पेस्ट करुन घेणे.
  3. चिकनला दही, तंदुरी मसाला, काश्मिरी लाल मिरची पावडर, काळिमिरीपूड, गरम मसाला, मीठ व हिरवी पेस्ट लावून मॅरीनेट करावे.
  4. रात्रभर फ्रिजमध्ये ठेवावे.
  5. बेकिंग ट्रेला ग्रीज करुन घेणे किंवा बेकिंग पेपर लावावा. त्यावे मॅरीनेट केलेले चिकन पीसेस ठेवावे.
  6. थोडेसे बटर सोडून २०० डिग्रीवर प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये १५ मिनिटे भाजावे.
  7. मधे एकदा उलटवून पुन्हा १५ मिनिटे भाजावे.
  8. स्मोक्ड फ्लेव्हर देण्यासाठी चिमट्यात चिकन पीस धरुन गॅसच्या शेगडीवर धरुन १ मिनिटे भाजावे.
  9. सॅलॅडसोबत सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर