मुख्यपृष्ठ / पाककृती / "पनीर चिली"
पनीर चिली हि डिश आपण हॉटेल मध्ये गेल्यावर बऱ्याचदा स्टार्टर म्हणून घेतो. मुलांपासून सर्वांच्याच आवडीची. एक सांगू अशी चमचमीत डिश आयती समोर आली की आहाहा काय लागते म्हणून सांगू, एकदम भारी. पण मुलीचा हट्ट, "मम्मा, तू बनव ना घरी, मला तुझ्या हातची खायचीय". अशा या लडिवाळ सांगण्याने माझ्यातील आई पाघळली आणि तयार झाली "पनीर चिली"! घरी सर्व सॉसेस होते, कॉनफ्लॉवरही होता आणि इतर साहित्य देखील होते, फक्त पनीर नव्हते. तेही आणले आणि सगळी तयारी झाली. त्यामुळे लगेच तयार झाली "पनीर चिली". बेटी खुश आणि बेटीचा बाबा भी खुश !
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा