Photo of Vada pav by Neha Santoshwar at BetterButter
508
2
0.0(0)
0

वडा-पाव

Oct-26-2018
Neha Santoshwar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वडा-पाव कृती बद्दल

पाऊस पडत असेल तर गरम गरम वडा-पाव. वा !!

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ४ उकडलेले बटाटे  
  2. बेसन १/२ कप
  3. लादी पाव वड्याच्या कव्हरसाठी- ४
  4. मीठ चवीप्रमाणे  
  5. १/४  टीस्पून हळद
  6. १ टेबलस्पून तेल
  7. ५  कढीपत्ता पाने
  8. १/४  टीस्पून मोहरी  
  9. २ टेबलस्पून कोथिंबीर
  10. ३  लसूण पाकळ्या+ १" आलं +१ हिरवी  मिरची - यांची  पेस्ट  

सूचना

  1. १. उकडलेले बटाटे सोलून हाताने कुस्करून घ्या. त्यात आलं-लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट,मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरून घाला
  2. २.हाताने छान कालवून घ्या. चव बघून मीठ -मिरचीचे प्रमाण वाढवा
  3. ३.कढईत  तेल गरम करा. तेल कडकडीत तापले कि त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, कढीपत्ता पाने, हळद आणि हिंग घालून कुस्करलेल्या बटाट्याला फोडणी द्या. हाताने, फोडणी पूर्ण सारणात मिक्स करा आणि त्याचे समान ६-७  गोळे करा.
  4. ४. वड्याच्या कव्हर साठी-  ४ कप बेसन घ्या. त्यात हळद,मीठ आणि बेताचे पाणी घालून एकजीव करा. बॅटर जास्ती पात्तळ किंवा खूप जाड नको.बॅटर मध्ये १ चमचा कडकडीत तेलाचे मोहन घाला म्हणजे कव्हर कुरकुरीत होईल.
  5. ५. वडे तळण्यासाठी कढईत पुरेसे तेल घ्या. तेल तापले कि बॅटरमध्ये सारणाचा गोळा बुडवून तेलात सोडा.वडे सोडायच्या वडे छान गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या. पावामध्ये तिखट चटणी लावून गरम गरम बटाटे वडे खायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर