मुख्यपृष्ठ / पाककृती / पिझ्झा पाणी पुरी

Photo of Pizza pani puri by Divya Jain at BetterButter
2908
5
0.0(0)
0

पिझ्झा पाणी पुरी

Oct-26-2018
Divya Jain
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिझ्झा पाणी पुरी कृती बद्दल

कुरकुरीत आणि तोंडाला पाणी सुटेल असे हे पिझ्झा पाणी पुरी बनवायला अगदी सोपे आणि खाण्यासाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • फ्युजन
  • बेकिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

  1. पाणी पुरी साठी- ३/४ कप बारीक रवा
  2. २ टेस्पून मैदा
  3. १/४ टिस्पून बेकिंग सोडा
  4. चवीपुरते मिठ
  5. पाणी
  6. तळण्यासाठी तेल
  7. पिझ्झा स्टफिंगसाठी- १/४ ते १/२ कप कांदा, पातळ उभा चिरून
  8. १/४ कप हिरवी भोपळी मिरची, पातळ उभी चिरून
  9. १/४ कप लाल भोपळी मिरची, पातळ उभी चिरून
  10. १/४ कप टॉमेटो, पातळ उभी चिरून
  11. १/२ कप स्वीट कॉर्न, वाफवून घ्यावे
  12. १/२ कप पिझ्झा सॉस
  13. १ कप किसलेले मोजरेला चिझ
  14. ड्राय बेसिल किंवा ओरेगानोची पाने
  15. २ ते ३ चिमटी मिठ
  16. सुक्या लाल मिरच्यांचा चुरा आवडीनुसार

सूचना

  1. रवा, मैदा, बेकिंग सोडा आणि मिठ एकत्र करावे. त्यात पाणी घालून एकदम घट्ट भिजवावे. सुती कपडा पाण्याने भिजवून घट्ट पिळून घ्यावा. भिजवलेला गोळा या कपड्याने १५ ते २० मिनीटे झाकून ठेवावे.
  2. नंतर भिजवलेल्या पिठाचे करवंदाएवढे छोटे गोळे करावे आणि ते गोळे कोरडे पडू नयेत म्हणून ओल्या फडक्याखाली ठेवून द्यावे.
  3. तेल मध्यम आचेवर तापवावे. गोळे लाटून पुर्‍या तळाव्यात. तेल खुप गरम किंवा खुप कोमट नसावे. मध्यम आचेवर तेल तापवावे.
  4. मोठ्या वाडग्यात पिझ्झा स्टफिंग घ्यावा व निट मिक्स करावे.
  5. सगळ्या पाणी पुरी मध्ये पिझ्झा स्टफिंग भरावे. आवडीनुसार अधिक चिज घालावे.
  6. बेकिंग ट्रे मध्ये पुर्‍या पसरवाव्यात.
  7. ओव्हन १०० C वर प्रिहीट करावा, बेकिंग ट्रे मधल्या रॅकवर ठेवावा आणि साधारण १० मिनीटे पुर्‍या बेक कराव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर