मुख्यपृष्ठ / पाककृती / स्पिनच नाचोस विथ साल्सा चिझ सोस

Photo of Spinach nachos with salsa cheese sauce by seema Nadkarni at BetterButter
593
1
0.0(0)
0

स्पिनच नाचोस विथ साल्सा चिझ सोस

Oct-26-2018
seema Nadkarni
40 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्पिनच नाचोस विथ साल्सा चिझ सोस कृती बद्दल

स्नॅक्स साठी हेल्दी पाक कृती आहे.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • मेक्सिकन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 जूडी पालक
  2. 1 कप मक्याचे पीठ
  3. 1/2 कप गव्हाचे पीठ
  4. 2 मोठा चमचा तूप
  5. 2 चमचा आले लसुण पेस्ट
  6. चवी पुरते मीठ
  7. 1/4 टि स्पून हळद
  8. 1 कप पाणी
  9. चिझ सोस साठी :-
  10. 1 कप किसलेला चीज
  11. 1/4 कप दूध
  12. 1 /4 टि स्पून मैदा
  13. 1 टी स्पून काळे मिरे पावडर
  14. साल्सा साठी :-
  15. 1, कांदा बारीक चिरलेला
  16. 1 टोमॅटो बारीक चिरलेला
  17. 1 केप्सीकम बारीक चिरलेली
  18. 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची
  19. 1 चमचा लिंबाचा रस
  20. चवी पुरते मीठ
  21. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. पालक ची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यात एक ग्लास पाणी घालून उकळी आली की गॅस बंद करून घ्या.
  2. थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
  3. एका ताटात मक्याचे पीठ, गव्हाचे पीठ एकत्र करून त्यात तूपाचे मोहन घालून हाताने मूठ वळेल असे झाले की त्यात आले लसुण पेस्ट, चवीपुरते मीठ, हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून एकत्र करून घ्यावे. त्यात पालक ची पेस्ट घालून घट्ट कणिक मळून घ्या.
  4. झाकण ठेवून थोड्या वेळाने पातळ पोळी लाटून त्याचे त्रिकोण आकार कापून तेलात तळून घ्यावे. काट्यांच्या चमच्याने त्यावर भोक पाडून घ्यावे. म्हणजे फुगनार नाही व कुरकुरीत होतात.
  5. चिझ सोस साठी पेन मध्ये थोडे बटर टाकून गरम करून त्यात मैदा भाजून घ्यावे. त्यात दूध घालून एकत्र करावे व त्यात किसलेले चीज व काळे मिरे पावडर घालून एकत्र करावे. एक उकळी आली की गॅस बंद करावा. थंड करून सर्व करावे.
  6. साल्सा साठी एका बाउल मध्ये बारीक चिरलेल्या कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, केप्सीकम, एकत्र करावे. त्यात चवीप्रमाणे मीठ, लिंबाचा रस, 1 चमचा तेल घालून एकत्र करावे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर