मुख्यपृष्ठ / पाककृती / मॅजिक कॉर्न कटलेट

Photo of Magic Corn Cutlet by Purva Sawant at BetterButter
1162
7
0.0(0)
0

मॅजिक कॉर्न कटलेट

Oct-26-2018
Purva Sawant
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॅजिक कॉर्न कटलेट कृती बद्दल

मुलांसोबत मोठ्यांना पण खुश करणारी प्रोटीनयुक्त सरप्राइज डिश ! बाहेरून खुसखुशीत आणि आत पनीरचा मुलायमपणा. पार्टीसाठी एकदम ग्रेट डिश...नक्की करून पहाच.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. मक्याचे उकडलेले दाणे- ½ कप
  2. उकडलेला बटाटा - १ मध्यम आकाराचा
  3. पनीर, किसून- ¼ कप
  4. हिरवी मिरची- २
  5. आलं- पाव इंच
  6. लसूण- २ पाकळ्या
  7. ओरेगॅनो- १ टीस्पून
  8. चिली फ्लेक्स - १ टीस्पून
  9. मिरी पावडर- ¼ टीस्पून किंवा चवीनुसार
  10. ब्रेड स्लाइस- २
  11. कॉर्न फ्लोअर- २ टीस्पून
  12. मीठ- चवीनुसार
  13. छोटा साबुदाणा - १ कप
  14. पिवळा खाण्याचा रंग- १ चिमटी
  15. तेल तळण्यासाठी- आवश्यकतेनुसार

सूचना

  1. एका बाउलमध्ये १ कप पाणी घ्या आणि त्यात खायचा रंग घाला. व्यवस्थित ढवळून त्यात साबुदाणा भिजवा. साधारण १५ ते २० मिनिटानंतर चाळणीवर ओतून त्यातील पाणी निथळून टाका आणि बाजूला ठेवून द्या.
  2. ब्रेड स्लाइसचे छोटे तुकडे करून मिक्सरला (पाणी न घालता) फिरवून त्याचा चुरा/क्रम्स बनवा.
  3. उकडलेले मक्याचे दाणे, हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे सर्व एकत्र पाणी न घालता मिक्सरवर भरड वाटून घ्या.
  4. बटाट्याचे साल काढून तो किसणीवर किसून घ्या.
  5. एका मोठ्या बाऊलमध्ये मक्याची भरड, किसलेला बटाटा, किसलेले पनीर, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, काली मिरी, ब्रेडचा चुरा, कॉर्न फ्लोअर आणि मीठ एकत्र करा.
  6. सर्व छान एकत्र करून व्यवस्थित मळून घ्या.
  7. वरील मिश्रणाचे छोटे गोळे बनवा. प्लास्टिक पेपरला तेलाचा हात लावून गोळा रोल करून लांबडा बनवा आणि मक्याच्या कणसाच्या आकाराचे कटलेट बनवा.
  8. आता साबुदाणा पूर्ण निथळला असेल. साबुदाण्याला एका प्लेटमध्ये पसरवा आणि त्यावर कटलेट हलकेसे दाबून रोल करा. सगळ्या बाजूनी साबुदाणे चिकटले पाहिजेत.
  9. कटलेट मध्यम आचेवर तळून घ्या आणि टिशू पेपरवर काढा.
  10. कटलेटमध्ये हळूच टूथपिक टोचा.
  11. गरमागरम मॅजिक कॉर्न कटलेट टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर