Photo of Tik Tok Starter by deepali oak at BetterButter
1193
4
5.0(1)
0

Tik Tok Starter

Oct-28-2018
deepali oak
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पोहे मीक्सरला पावडर करून दिड वाटी
  2. बटाटे ऊकडुन ४ मोठे
  3. तिखट १ चमचा
  4. हळद व हिंग पाव चमचा
  5. आमचूर पावडर पाव चमचा
  6. गरम मसाला पाव चमचा
  7. खायचा सोडा पाव चमचा
  8. चणाडाळ पीठ दोन चमचे
  9. कोथिंबीर दोन वाटी चीरून
  10. हिरव्या मिरच्या ४/५
  11. आले पाव ईंच
  12. ओले खोबरे तुकडे पाव वाटी
  13. भाजलेले शेंगदाणे पाव वाटी
  14. लिंबुरस एक चमचा
  15. मीठ
  16. साखर एक लहान चमचा
  17. तळणीसाठी तेल
  18. पाणी

सूचना

  1. आवरणासाठी ऊकडलेले बटाटे कुस्करुन घ्या.
  2. त्यात पोह्याची पावडर घाला‌.
  3. तिखट ,मीठ,हिंग,हळद व आमचूर पावडर गरम मसाला व सोडा घाला
  4. एक वाटी कोथिंबीर व चणाडाळ पीठ घालून पाणी न वापरता मळुन घ्या
  5. हे जरा वेळ असेच झाकुन ठेवा
  6. आता सारण तयार करूया
  7. सारणासाठी खोबरे तुकडे,मीरच्या
  8. आले,शेंगदाणे व कोथिंबीर
  9. मीठ,साखर,लींबुरस हे सर्व एकत्र करा
  10. अगदी थोडं पाणी घेऊन हे कोरडे वाटुन घ्या
  11. आता बटाट्याचे मळुन ठेवलेल्या कणकेला जरासा पाण्याच्या हाताने पुन्हा जरा मळुन घ्या
  12. हाताला जरासे तेल लाऊन एक गोळा घेऊन पारी तयार करा व बनवलेले सारण त्यात अलगपणे भरा
  13. कचोरी प्रमाणे नीट बंद करून गरम तेलात तळुन घ्या
  14. तयार तुमचे टीक टाॅक स्टार्टर

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Oct-28-2018
samina shaikh   Oct-28-2018

मस्तच

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर