मुख्यपृष्ठ / पाककृती / इनोव्हेटिव्ह स्टफ्ड अळुवडी

Photo of Innovative stuffed aaluvadi by Chayya Bari at BetterButter
442
11
0.0(0)
0

इनोव्हेटिव्ह स्टफ्ड अळुवडी

Oct-28-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इनोव्हेटिव्ह स्टफ्ड अळुवडी कृती बद्दल

अळुवडी सर्वांची आवडती तशीच सांबार वडी पण ह्या दोघांचं मिळून मी हये innovation केलय. सांबार वडीचा मसाला अळुवडीत स्टफ केलाय

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. सारण भरण्या साठी-कोथिंबीर १वाटी
  2. खोबरे कीस १ वाटी
  3. तिखट १चमचा
  4. हळद १/२चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. चिंचेचा कोळ व गूळ मिश्रण १/२वाटी
  7. गरम मसाला १/२चमचा
  8. तेल तळण्यासाठी
  9. अळूची पाने ६ मध्यम आकाराचे
  10. वडी माखण्यासाठी बेसन २वाट्या
  11. तिखट १चमचा
  12. हळद १/२चमचा
  13. मीठ चवीनुसार
  14. ती ळ २चमचे

सूचना

  1. प्रथम अळूची पाने धुवून पुसून घ्या
  2. आता खोबरे किस परतून घ्या,तीळ भाजून घ्या कोथिंबीर गरम कढईत घालून हलवून काढून घ्या
  3. आता स्टफ्फिंगचे मिश्रण तयार करण्यासाठी खोबरे किस,1चमचा तीळ, कोथिंबीर तिखट,मीठहळद,गरम मसाला एकत्र करून घ्यावे तसेच बेसनात तिखट,मीठ ,हळद 1चमचा तीळ,चिंच व गुळाचे मिश्रण घालावे व बेसन भिजवावे
  4. पानांची देठे काढून शिरेचा भाग वर येईल असे पान ठेवावे त्यावर पीठ लावून सारण पसरावे आता दुसरे पान ठेवून परत बेसन व सारण पसरावे
  5. आता कडा दुमडून रोल करून घ्या्वा
  6. चाळणीला तेल लावून त्यावर रोल ठेवावे कढईत पाणी घालून स्टन्ड ठेऊन त्यावर चाळणी ठेवावी व १५मिनीटे वाफवून घ्यावेत
  7. थंड झाल्यावर तळून घ्यावे गार झाल्यावर वड्या कापाव्यात
  8. चिंचेच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर