मुख्यपृष्ठ / पाककृती / सुरमई फ्राई

Photo of Surmai fry by Shaheda T. A. at BetterButter
0
2
0(0)
0

सुरमई फ्राई

Oct-28-2018
Shaheda T. A.
8 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरमई फ्राई कृती बद्दल

मराठीचा फेव्हरिट स्टार्टर।

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • स्नॅक्स
 • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

 1. सुरमई माशाचे तुकडे ८ ते १०
 2. बेसन २ मोठा चमचा
 3. लाल तिखट २ चमचा
 4. धनेपूड १ चमचा
 5. फिश मसाला २ चमचा
 6. हळद १/२ चमचा
 7. लिंबू रस १ मोठा चमचा
 8. आलं-लसूण पेस्ट १ चमचा
 9. रवा गरजेनुसार
 10. चवीनुसार मीठ
 11. गरजेनुसार तेल

सूचना

 1. सर्वात आधी सुरमईचे तुकडे नीट धुवून घ्या व त्यांना हळद,लिंबू रस व आलं-लसूण पेस्ट लावून अर्धा ते १ तास मुरत ठेवा (मेरीनेट करत ठेवा)।
 2. आता एका प्लेटमध्ये लाल तिखट, धनेपूड, फिश मसाला, बेसन व चवीनुसार मीठ  एकत्र करून चांगले एकजीव करून घ्यावे।
 3. वरील मेरीनेतेड तुकड्यांना हा मसाला नीट लावून घ्यावा म्हणजेच हे तुकडे मसाल्यात नीट घोळवून घ्यावे, मसाल्यात घोळवाल्यानंतर हे तुकडे रव्यात घोळवून घ्यावेत।
 4. आता एका फ्रायिंग पॅनमध्ये तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि मसाला लावलेले माशाचे तुकडे त्यावर अलगद ठेवावे ,ते ह्याप्रमाणे दिसतील।
 5. एक बाजू चांगली खरपूस झाली कि दुसरी बाजूही चांगली खरपूस भाजून घ्यावी व आच बंद करावी। गरमागरम सुरमई फ्राय सर्व्ह करण्यासाठी तयार असतील।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर