मुख्यपृष्ठ / पाककृती / वांगी भजे सलाद

Photo of Brinjal Bhajiya Salad by Jayshree Bhawalkar at BetterButter
616
4
0.0(0)
0

वांगी भजे सलाद

Oct-28-2018
Jayshree Bhawalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांगी भजे सलाद कृती बद्दल

ही माझी आपली रेसिपी आहे .घरी वांग आवडीने नाही खाल्लं जात.म्हणून मी ही रेसिपी बनवली आणि सगळ्यांनी मिटक्या मारत खाल्ली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • किटी पार्टी
  • मध्य प्रदेश
  • फ्रायिंग
  • सॅलड
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 2

  1. 3 केळ वांगी
  2. 1 कांदा बारीक चिरलेला
  3. 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली
  4. 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली
  5. 1 चमचा लिंबाचा रस
  6. 1 चमचा चाट मसाला
  7. 1 वाटी बेसन
  8. 1/2 चमचा मिठ
  9. 1 चिमूट हळद
  10. 1/2 चमचा लाल तिखट
  11. 1/2 चमचा बेकिंग पावडर
  12. तळण्या करता तेल

सूचना

  1. केळ वांगी ना मधून चिरा लावा दोन भाग वेगळे नाही करायचेआणि थोडं मिठ भुरकून तळून घ्या
  2. आता एका वाडग्यात बेसन आणि तिखट,मिठ बेकिंग पावडर हळद साहित्य मिक्स करून भाज्यां साठी घोळ तैयार करावे
  3. आता तळलेले वांगी बेसनात बुडवून भजे तळून काढा
  4. आता एका अजून वाडग्यात चिरलेला कांदा,कोथींबीर ,लिंबा चा रस आणि मिठ नीट मिक्स करून ठेवा
  5. आता तळलेल्या भजींना पुन्हा चिरा लावून कांदा चा सलाड भरून वरून चाट मसाला भुरकून टमाटर सॉस बरोबर गरमागरम वाढा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर