मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबी गुलाब समोसा

Photo of Kobi gulab samosa by Rohini Rathi at BetterButter
829
2
0.0(0)
0

कोबी गुलाब समोसा

Oct-28-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबी गुलाब समोसा कृती बद्दल

कोबी समोसा ही एक नवीन पाककृती आहे त्यात मी बटाटा वापरण्याऐवजी कोबी वापरून समोसा चे सारण बनवले आहे व मैद्यामध्ये बेट चा ज्यूस घालून समोसा बनवण्याची व जी गुलाब अचा आकार बनवून हा समोसा बनवला आहे खाण्यास दिसण्यास खूप छान लागतो .

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. समोसाची आवरण बनवण्यासाठी
  2. मैदा एक कप
  3. बिट प्युरी एक कप
  4. तेल दोन टेबल स्पून
  5. चवीनुसार मीठ
  6. सारण बनवण्यासाठी
  7. किसलेला कोबी अर्धा कप
  8. बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टेबल स्पून
  9. किसलेले ओले खोबरे पाव कप
  10. हिरव्या मिरचीची पेस्ट एक टेबल स्पून
  11. आले-लसणाची पेस्ट 1 तीस्पून
  12. लिंबाचा रस चवीनुसार
  13. बेसन पाव कप
  14. तेल दोन टेबल स्पून
  15. राई जीरा हिंग फोडणीसाठी
  16. तेल समोसे तळण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम आवरण बनवण्यासाठी मैद्यामध्ये मीठ तेल व बीटची प्युरी प्युरी घालून समोसा चे पीठ बनवून घ्या
  2. आवरण बनवण्यासाठी
  3. किसलेल्या कोबीला हातामध्ये दाबून त्याचे पाणी काढून घ्यावे
  4. नंतर त्यात कोथिंबीर किसलेले खोबरे हिरवी मिरची आले लसणाची पेस्ट लिंबाचा रस मीठ एकत्र करून घ्यावे
  5. नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी हिंग ची फोडणी घालावी
  6. नंतर तयार कोबीचे मिश्रण घालून परतून घ्यावे
  7. मिश्रण कोरडे झाल्यानंतर त्यात बेसन घालून परतून घ्यावे
  8. तयार मिश्रण थंड करून घ्यावे
  9. गुलाब समोसा बनवण्यासाठी तयार मैद्याच्या पिठाचे छोटा गोळा घेऊन पुरी लाटून घ्यावी
  10. अशाच तीन पुऱ्या लाटून घ्याव्या
  11. नंतर त्या पुड्या एकमेकांवर ठेवून समोसा चे सारण भरून घ्यावे
  12. नंतर सारणाचा अर्धा भाग दुमडून घ्यावा
  13. एका बाजूने पाकळीप्रमाणे दुमडून गुलाबाचे फुल बनवून घ्यावे
  14. इतर मसाला आत मध्ये दाबून गुलाबाच्या पाकळ्या घट्ट करून घ्यावे
  15. कढईमध्ये तेल गरम करून समोसा मंद आचेवर तळून घ्यावा
  16. अशा प्रकारे तयार कोबी गुलाब समोसा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर