मुख्यपृष्ठ / पाककृती / चायनीझ टोमॅटो बोंडा

Photo of Chinease Tomato Bonda by Jayshree Bhawalkar at BetterButter
926
11
0.0(0)
0

चायनीझ टोमॅटो बोंडा

Oct-28-2018
Jayshree Bhawalkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चायनीझ टोमॅटो बोंडा कृती बद्दल

ही रेसिपी माझी आपली रेसिपी आहे.मी आपल्या बटाटे वड्या ला चायनिझ रूप दिले आणि बच्चे कंपनी बरोबर मोठ्ठ्याना ही रेसिपी आवडली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • फ्युजन
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 छोटे लाल टमाटर
  2. 1 मोठा चमचा बारीक चिरलेली हिरवी शिमला मिरची
  3. 1 मोठा चमचा बारीक चिरलेली पान कोबी
  4. 1 मोठा चमचा बारीक चिरलेला कांदा
  5. 1/2 चमचा ऑरेंगेनो
  6. 1/2 चमचा काळी मिरी पावडर
  7. 1/4 चमचा मिठ
  8. 1 पाकीट हक्का नूडल्स
  9. 1/2 कप कॉर्नफ्लोर
  10. 250 ग्राम उकडलेले बटाटे
  11. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा
  2. पाणी उकळे कि त्यात लांब च नूडल्स टाका आणि एक कसर राहील असे शिजवून घ्या
  3. आता शिजलेले नूडल्स चाळणीत घेऊन पाण्यानी धून घ्या,त्यावर 1 चमचा तेल घालून मिक्स करून घ्या म्हणजे ते एकदुसर्याला चिकटणार नाही.
  4. एक वाडग्यात सगळ्या चिरलेल्या भाज्या,ऑरेंगेनो,काळी मिरी पावडर,चीझ आणि थोडं मिठ नीट मिक्स करा.
  5. आता उकडलेले बटाटे मॅश करून त्यात मिठ, आणि काळी मिरी पावडर एखाद चमचा कॉर्नफ्लोर घालून नीट गोळा तैयार करा.
  6. आता टमाटर च्या वर ची टोपी एका स्लाइस बरोबर कापून वेगळी ठेवा ही नन्तर बंद करायला कामी येईल
  7. स्कुपर नी टमाटर आतून रिकामे करून घ्या.
  8. ह्या टमाटर मधे कोबी शिमला मिरची आणि चीझ वाल सारण नीट भरून वर कापलेली स्लाइस लावून बंद करा
  9. आता ह्या टमाटर ना बटाट्या च्या गोळ्या नी पूर्ण बंद करा ,जस की भरलेला टमाटर पुरण चा गोळा आहे आणि बटाट्या ची कणिक आहे.
  10. आता शिजलेल्या नूडल्स वर कार्नफ्लोर घालून एक कोटिंग करा
  11. हे लांब नूडल्स टमाटर बटाट्याच्या बॉल वर गुंडाळून घ्या .जर गरज वाटली तर गोळा पाण्याचा हाथ लावून ओला करून थोडं कॉर्नफ्लोर भुरकून घ्या
  12. हे नूडल्स चिकटवलेले बॉल गरम तेलात तळून घ्या
  13. आता थोडे कॉर्नफ्लोर लावलेले नूडल्स पण तळून घ्या,हे सर्व करताना कामी येतील.
  14. 2 चायनिझ टोमॅटो बोंडा पैकी एका ला धारदार सुरी नी कापून दोन भाग करा.
  15. आता सर्व्हिंग डिश मधे तळलेले नूडल्स वर ठेवून गरमागरम टोमॅटो सॉस आणि सोया सॉस बरोबर थोडं सलाड ठेवुन सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर