मुख्यपृष्ठ / पाककृती / Chinese Bhel.

Photo of Chinese Bhel. by Triveni Patil at BetterButter
0
3
5(1)
0

Chinese Bhel.

Oct-28-2018
Triveni Patil
40 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किटी पार्टी
 • चायनीज
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

 1. १. १पँकेट हक्का नूडल्स.
 2. २.अर्धी वाटी बारीक कापलेला पातीचा कांदा
 3. ३.अर्धी वाटी पत्ता कोबी बारिक चिरून.
 4. ४.अर्धी वाटी मोड आलेले मुग दाणे.
 5. ५.मुठभर भाजलेले शेंगदाणे.
 6. ६.१ चमचा सोया सॉस.
 7. ७.१ चमचा रेड चिल्ली सॉस.
 8. ८.१ चमचा टोमँटो साँस.
 9. ९.मीठ चवीनुसार.
 10. १०.तेल नूडल्स तळुन घेण्यासाठी .
 11. सजावटी साठी -
 12. कांदा पात .

सूचना

 1. १. एका कढई मध्ये पाणी उकळवायला ठेऊन त्या पाण्या मध्ये १ पळी तेल टाका पाणी उकळलायला लागले की नूडल्स टाकून १० ते १५ मिनिट शिजवून घ्या.
 2. २.गँस बंद करून ह्या नूडल्सला चाळणीत काढून पाणी नितरवून घ्या, नुडल्स वर थोडे तेल टाकून एका सपाट प्लेट मध्ये ह्या नूडल्स थंड करा जेणे करून आपल्याला त्या तळून घेता येतील .
 3. ३. आता गरम तेला मध्ये नूडल्स golden brown रंगावर तळून घ्या आणि त्यांचा चुरा करून घ्या . (जास्त बारीक करू नये ) आणि थोडा वेळ बाजूला ठेवा.
 4. ४.एका दुसर्या बाऊल मध्ये पाती कांदा , मुग दाणे तव्या वर थोडे फ्राय करुन घ्या व बाऊल मध्ये टाका, शेंगदाणे, बारिक चिरलेली कोबी टाका . आता या मध्ये मीठ ,सोया सॉस, रेड चिल्ली सॉस, टोमँटो साँस टाका आणि व्यवस्थित मिसळून घ्या
 5. ५.आता तळलेल्या नूडल्स त्यात योग्य पद्धतीने मिक्स करा.
 6. ६. वरून थोडीशी पत्ता कोबी आणि पातीकांदा टाकून भेळ सर्व्ह करा. ड्राय मंच्युरीयन एँव्हिलेबल असतील तर ते पण अँड करा.
 7. ७. आजकल मार्केट मध्ये फ्राईड नुडल्स भेटतात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Oct-28-2018
samina shaikh   Oct-28-2018

very nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर