चकली | CHAKALI Recipe in Marathi

प्रेषक Sneha Adhav  |  29th Oct 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of CHAKALI by Sneha Adhav at BetterButter
चकलीby Sneha Adhav
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  2

  तास
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

चकली recipe

चकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make CHAKALI Recipe in Marathi )

 • 2 किलो तांदूळ
 • अर्धा किलो मुगडाळ
 • अर्धा किलो चणाडाळ
 • अर्धा किलो उडीद डाळ
 • एक वाटी धणे
 • अर्धी वाटी जिरे
 • तेल
 • चकली मसाला
 • मीठ
 • पाणी

चकली | How to make CHAKALI Recipe in Marathi

 1. २ किलो तांदूळ, अर्धा किलो मुगडाळ, अर्धा किलो चणाडाळ, अर्धा किलो उडीद डाळ, १ वाटी धणे, अर्धी वाटी जिरे.
 2. तांदूळ व डाळी स्वच्छ धुवून पंख्याखाली वाळवून घ्यावे. नंतर हे सर्व वेगवेगळे भाजून (धणे व जिरे पण भाजावे) दळून आणावे.
 3. दळून आणलेल्या पीठापैकी २ वाट्या पीठ घ्या. आता १ वाटी (छोटा ग्लास) पाणी gas वर गरम करत ठेवा. 
 4. या पाण्याला १ उकळी आली कि त्यात १ छोटी वाटी तेल, चवीनुसार मीठ, चकली मसाला, व नंतर पीठ घालून चांगले मिक्स करा. व झाकण ठेवून gas बंद करा. थंड झाले कि थोडे थोडे पीठ घेवून चांगले मळावे व चकली साच्या मध्ये घालून चकल्या पाडाव्यात व छान तळून घ्या. 

Reviews for CHAKALI Recipe in Marathi (0)