मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजणी चकली

Photo of Bhajani chakali by Manasvi Pawar at BetterButter
977
3
0.0(0)
0

भाजणी चकली

Nov-01-2018
Manasvi Pawar
1440 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजणी चकली कृती बद्दल

दिवाळी फराळ चकली चा एक प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 6

  1. भाजणी साहित्य
  2. चणाडाळ 1 कप
  3. तांदूळ 1/4 कप
  4. मूग डाळ 1/4 कप
  5. उडीद डाळ 1/4 कप
  6. ज्वारी आणि साबुदाणा मिळून 1/4 कप
  7. इतर साहित्य
  8. जिरे पावडर 1/2 चमचा
  9. धणे पावडर 1/2 पावडर
  10. तीळ 1/2 चमचा
  11. तेल 1 कप
  12. लाल तिखट 1 चमचा
  13. मीठ चवीनुसार
  14. पाणी पीठ मळण्यासाठी
  15. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. भाजणीचे साहित्य छान भाजून बारीक दळून आणावे
  2. आता चकली साठी दोन कप भाजणीचे पीठ घ्या
  3. पीठामधे तीळ जिरे धणे पावडर लाल तिखट आणि मीठ घाला
  4. 1/4 कप तेल कोमट करून पीठामधे घ्या
  5. थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ मळून घ्या
  6. 30मिनिटे पीठ असेच राहू द्या
  7. आता चकली करताना चकलीच्या साच्याला तेलाचा हात फिरवून घ्या आणि साच्यामध्ये पीठ घालून तो व्यवस्थित बंद करा
  8. आता पेपरवर चकली पाडून घ्या
  9. तेल गरम करून तेलात एक लहान गोळा सोडा तो गोळा खाली राहिला तर तेल नाही तापले समजावे गोळा हळूहळू वर आला की तेल तापले समजावे
  10. आता आपण केलेल्या चकल्या एकावेळी तीन ते चार तेलात सोडाव्यात
  11. छान सोनेरी रंगावर तळून घ्यावेत
  12. तयार आहेत आपल्या दिवाळीच्या फराळासाठी भाजणी चकली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर