मुख्यपृष्ठ / पाककृती / मिल्क पावडर बेसन लाडू

Photo of Milk Powder Besan Ladu by Deepa Gad at BetterButter
790
6
0.0(0)
0

मिल्क पावडर बेसन लाडू

Nov-01-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिल्क पावडर बेसन लाडू कृती बद्दल

बेसन लाडू वेगळ्या चवीचे, मिल्क पावडर घातल्यामुळे तोंडात घातले की विरघळणारे, अहाहा..... हो मी आज मिल्क पावडर बेसन लाडू बनविलेत, बघाच रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 10

  1. बेसन (बारीक दळलेले) १/२ किलो
  2. पिठीसाखर १/२ किलो
  3. मिल्क पावडर ८ मोठे च
  4. तूप पाव किलो
  5. वेलची व सुंठ पावडर १ च
  6. दूध पाव कप
  7. चिमूट मीठ
  8. पिस्त्याचे काप

सूचना

  1. तुपात बेसन खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या, भाजतानाच त्यात अगदी चिमूट मीठ टाका
  2. भाजल्यानंतर गॅस बंद करून हाताने दूध शिंपडा म्हणजे ते फुलेल तेव्हा ढवळून घ्या व्यवस्थित
  3. नंतर त्यात मिल्क पावडर घाला व एकजीव करा
  4. थंड करायला परातीत ओता
  5. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची, सुंठ पावडर घाला, सुंठ पावडर घातल्यामुळे बेसन बाधत नाही
  6. सर्व एकजीव करून पीठ मळतो तसे मळून घ्या
  7. लाडू वळा वरून पिस्त्याचे काप लावा, तयार आहेत मिल्क पावडर बेसन लाडू

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर