मुख्यपृष्ठ / पाककृती / चुडा घासा - दालमा (डाळ करीबरोबर पोह्यांची पावडर)

Photo of Chuda Ghasa - Dalma ( Powdered beaten rice with Dal curry ) by sweta biswal at BetterButter
4081
65
5.0(0)
0

चुडा घासा - दालमा (डाळ करीबरोबर पोह्यांची पावडर)

Aug-25-2015
sweta biswal
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • ओरिसा
  • प्रेशर कूक
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी पोहे
  2. 1 वाटी खवलेले नारळ
  3. 3-4 लहान चमचे तूप
  4. 4-5 लहान चमचे साखर
  5. एक चिमूटभर फूड ग्रेड कापूर
  6. दीड वाटी तूर/चणाडाळ
  7. अर्धी वाटी भोपळ्याचे तुकडे
  8. अर्धी वाटी बटाटे
  9. 1 शेवग्याची शेंग (2 इंचाचे तुकडे कलेली)
  10. अर्धी वाटी खवलेले नारळ
  11. 3-4 सुक्या लाल मिरच्या
  12. अर्धा लहान चमचा जिरे
  13. 1 तमालपत्र
  14. चिमूटभर हिंग
  15. 2 लहान चमचे तूप
  16. अर्धा लहान चमचा हळद
  17. मीठ चवीनुसार
  18. 1/3 लहान चमचा जीर मिरची पूड

सूचना

  1. एका ताटात वाटलेले जाड पोहे घ्या. पोहे साखर आणि तुपात चांगले मिसळा (हे जरा अवघड आणि वेळ घेणारे काम आहे). तूप आणि साखरेच्या मिश्रणात एकजीव होईपर्यंत मिसळा.
  2. आता त्यात खवलेले नारळ आणि कापूर घाला. तुम्हाला मिश्रण कोरडे वाटले, तर त्यात थोडे पाणी घाला. आमचे चुडा घासा तयार आहे.
  3. चण्याची डाळ धुऊन 5-6 तसा भिजवा. प्रेशर कूकरमध्ये चण्याच्या डाळीत भोपळा आणि बटाटे घालून 2 कप पाणी घाला आणि दोन शिट्या होऊ द्या.
  4. गॅस बंद करा आणि कुकर थंड होऊ द्या. आता त्यात शेवग्याच्या शेंगा घालून पुन्हा 1 शिटी होऊ द्या.
  5. फोडणीसाठी - एका कढईत तूप गरम करा. यात लाल मिरची, जिरे, तमालपत्र आणि हिंग घाला.
  6. या फोडणीला डाळीवर घाला आणि भाजलेल्या जिरे मिरची पूड,खवलेल्या नारळाने सजवा. आता आमचा दालमा तयार आहे.
  7. एका ताटात एक चमचाभर चुडा घासा घ्या आणि त्यावर पळी भरून दालमा घाला. एकत्र करा आणि आस्वाद घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर