मुख्यपृष्ठ / पाककृती / खुसखुशीत करंजी

Photo of Tasty Karanji by Shubhangi Dubile at BetterButter
584
5
0.0(0)
0

खुसखुशीत करंजी

Nov-02-2018
Shubhangi Dubile
25 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खुसखुशीत करंजी कृती बद्दल

सर्वचा आवडता पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा 2 वाटया
  2. साजूक तूप 2 चमचे
  3. दुध 1 वाटी
  4. खायचा सोडा 1/2 टिस्पून
  5. सारणासाठी साहित्य
  6. खवलेला नारळ 2 वाटया
  7. खसखस 2 चमचे
  8. पांढरे तीळ 2 चमचे
  9. खारीक पूड 2 चमचे
  10. पिठीसाखर 4 चमचे
  11. इलायची पावडर 1/2 टिस्पून

सूचना

  1. सारणासाठी एका पॅन मध्ये 1/2 चमचा तूप गरम करून त्यात खोवलेला नारळ छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या. नारळ एका बाजूला काढून ठेवा.
  2. भाजलेला नारळ हाताने बारीक करुन घ्या.
  3. पॅन मध्ये तीळ आणि खसखस भाजून घ्या. आता तीळ आणि खसखस जाडसर वाटून घ्या.
  4. एका बाउल मध्ये नारळ,तीळ आणि खसखस,पिठीसाखर, ईलायची पावडर, खारीक पूड टाकून एकजीव करून घ्यावे.मिश्रण एका बाजूला ठेवून द्या.
  5. एका वाटीत साजूक तूप किंचीत गरम करून घ्यावे.
  6. ताटात मैदा घेऊन त्यात गरम केलेले तूप घालून तूप मैद्याला व्यवस्थित लावून घ्या.
  7. थोडे थोडे दूध घालून कणिक मळून घ्या. कणिक खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावी.
  8. ओल्या कपड्यात कणिक 15 - 20 मिनट झाकून ठेवावी.
  9. 20 मिनटा नंतर पून्हा कणिक छान मळून घ्यावी.
  10. कणकेच्या हव्या असलेल्या आकारात करंज्या बनवून ओल्या कपड्या खाली झाकून ठेवाव्या.
  11. कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर करंज्या तळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर