BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / स्माईली बेसन डिंकयुक्त् लाडू

Photo of Smiley Besan Dink Ladoo by Shraddha Juwatkar at BetterButter
0
6
0(0)
0

स्माईली बेसन डिंकयुक्त् लाडू

Nov-02-2018
Shraddha Juwatkar
1 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्माईली बेसन डिंकयुक्त् लाडू कृती बद्दल

दिवाळी म्हटली की बेसनाचे लाडू आलेच आणि बेसनचे लाडू म्हटले की दिवाळी ही आलीच. दिवाळीच्या फराळाचे ताट बेसनाच्या लाडवांशिवाय अपूर्णच वाटते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • कठीण
 • दिवाळी
 • महाराष्ट्र
 • रोस्टिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. 500 ग्राम लाडवाचे बेसन
 2. 300 ग्राम तूप
 3. 1/2 वाटी कोमट दूध
 4. 300 ग्राम पिठी साखर (आवडीनुसार कमी जास्त करू शकता)
 5. 1 वाटी बारीक रवा
 6. 1 वाटी डिंक
 7. आवडीनुसार सुकामेवा
 8. वेलची व जायफळ पूड
 9. सजावटीसाठी काजू व चारोळ्या

सूचना

 1. चणा डाळ चांगली स्वछ निवडून मध्यम गॅसच्या आचेवर रंग बदले पर्यंत खमंग भाजून घ्यावी व थंड झाल्यावर गिरणीतून रवाळसर दळूण आणायची.
 2. बेसन थोड्या तुपावर भाजायला घ्यायचं. सगळं तूप एकदम घालायचं नाही, नाहीतर मिश्रण फसफसतं. थोडं थोडं तूप घालत बेसन पूर्ण भिजेल इतकं व्हायला हवं.
 3. बेसन तूपामध्ये मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यावे (साधारण ३५ ते ४० मिनीटे). भाजताना सारखे ढवळत राहावे. तूपात बेसन घातल्यावर आधी घट्ट होईल आणि साधारण ५ ते ७ मिनीटांत पातळ व्हायला लागेल
 4. बेसन व्यवस्थित भाजले गेले आणि खमंग वास आला कि दुधाचा हबका मारावा. यामुळे बेसन चांगले फुलेल (आधी फसफसेल) आणि घट्टसर होईल.पाच मिनिटं परतून गॅस बंद करावा. बेसन लगेच दुसर्‍या भांड्यात काढून ठेवावे.
 5. त्याच कढईत पुन्हा थोडे तूप घालून डिंक चांगला तळून घ्या व बाजूला काढून ठेवावा.
 6. राहिलेल्या तुपात रवा खमंग भाजून घ्यावा.
 7. साधारण २० मिनीटांनी यात सुका मेवा, वेलची जायफळ पूड आणि साखर घालून हलके मळून ठेवून द्यावे. गार झाले कि लाडू वळावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर