Photo of Chavde by Deepa Gad at BetterButter
972
6
0.0(0)
0

चवडे

Nov-05-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चवडे कृती बद्दल

खरंतर हा कोंकणी (कोंकणी म्हणजे मालवणी नाही बरं का! ) लोकांचा पदार्थ आहे. करंज्या एकटीने करू शकत नाही कंटाळा आलाय... :blush: मग चला तर आज मी तुमच्यासाठी खास जी रेसिपी दाखवत आहे ती खाल्ल्यावर करंजी खाल्ल्यासारखेच वाटते पण एकतर त्या गरम गरम खाव्यात किंवा फ्रीजमध्ये ठेवून खाव्यात नाहीतर गार झाल्यावर मऊ होतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा १ कप
  2. दूध ३/४ कप
  3. तूप २ छोटे च
  4. मीठ चवीनुसार
  5. सुक खोबरे किसलेले १ कप
  6. पिठीसाखर ३/४ कप
  7. खसखस १ च
  8. तीळ १ च
  9. वेलचीपूड
  10. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. किसलेले सुके खोबरे, तीळ, खसखस वेगवेगळे भाजून घ्यावे
  2. डिशमध्ये काढून त्यात पिठीसाखर, वेलचीपूड घालून मिक्स करा, हे झाले सारण तयार
  3. मैद्यात कडकडीत तुपाचे मोहन, मीठ घालून दूध घालून घट्ट मळा व १५ मिनिटे झाकून ठेवा
  4. मध्यम आकाराचे गोळे करून पुरीसारखे पातळ लाटा
  5. तेलात तळा,
  6. लगेच डिशमध्ये काढुन त्यावर सारण पसरा व दुमडून घ्या
  7. दिवाळीसाठी खास तयार आहेत चवडे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर