मुख्यपृष्ठ / पाककृती / दगडी पोहे चिवडा

Photo of Dagdi pohe chivda by Ujwala Surwade at BetterButter
1435
3
0.0(0)
0

दगडी पोहे चिवडा

Nov-06-2018
Ujwala Surwade
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दगडी पोहे चिवडा कृती बद्दल

छान झटपट होणारा खमंग आणि खुशखुशीत असा हा चिवडा. अगदी लहानपणापासून आवडणारा पदार्थ आवडायचं कारणही तसंच मस्त आई जेव्हा बनवायची तेव्हा मी तिच्या जवळच बसायची लूडबूड करायला .म्हणजे च चिवडा हलवायला मीठ मसाले मिक्स करायला.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. दगडी पोहे अर्धा किलो
  2. मका पोहे पाव किलो
  3. लाल तिखट 3चमचे
  4. हळद पाव चमचा
  5. गरम मसाला एक चमचा
  6. हींग साधारण एक चमचा
  7. शेंगदाणे अर्धी वाटी
  8. कढीपत्ता
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल तळण्यासाठी
  11. पिठीसाखर दोन चिमूट

सूचना

  1. पूर्व तयारी मधे पोहे गाळून निवडून घ्यावे .आणि सर्व जिन्नस वाटीत काढून ठेवावे.
  2. ऐनवेळी गडबड नको कारण एकदा का तेल तापले की पटापट करावे लागते.
  3. मोठे पातेलं घ्यावे हलवायला बरे पडते
  4. कढीपत्ता स्वच्छ धुवून पाणी निथळून ठेवावा
  5. तेल तापले की मूठभर पोहे तळायला टाकावे. ते तळून काढले की मक्याचे पोहे टाकून तळून पातेल्यात काढावे.
  6. आणि पोहे गरमागरम असतानाच त्या वर तिखट मीठ हींग गरम मसाला टाकत हलवत रहावे .
  7. अश्या प्रकारे सर्व पोहे तळून सर्व जिन्नस टाकून मिक्स करावे नंतर शेंगदाणे तळून तेही घालून मिक्स करावे.
  8. सगळ्यात शेवटी कढीपत्ता तेलात तळून कुरकुरीत करून तोही मिक्स करावा
  9. थोडी पिठीसाखर भुरभुरून मिक्स करून गार झाले की डब्यात भरावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर