मुख्यपृष्ठ / पाककृती / पुडाच्या करंज्या

Photo of Pudachi Karanji by SUCHITA WADEKAR at BetterButter
6165
11
0.0(0)
0

पुडाच्या करंज्या

Nov-09-2018
SUCHITA WADEKAR
30 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुडाच्या करंज्या कृती बद्दल

"पुडाची करंजी" ही माझी आजी बनवायची. माझ्या लहानपणी मिक्सर, फ्रीज असे काही नव्हते. आई, आजी पाट्यावर वाटण, पुरण वाटायच्या. आम्ही बहिणी ही मदत करायचो. करंजी ची कणिक घट्ट भिजवावी लागते त्यामुळे करंज्या करण्यापूर्वी आजी ती कणिक पाट्यावर मुसळाच्या साहाय्याने चेचून घ्यायची त्यावेळी मुसळ पडू नये म्हणून आम्हा मुलांना ती एका हाताने धरायला लावायची. आम्हालाही खूप मजा यायची. ते मुसळ वर-खाली होताना मऊ होत जाणारी कणिक पाहून खूप गंमत वाटायची. त्यावेळी केलेले निरीक्षण आता कामास येतेय याची जाणीव होते आणि खूप छान वाटते. आता मिक्सर, फूडप्रोसेसर ने काम हलके केलेय पण त्यात ती मजा नाही जी आम्ही अनुभवलीय. असो. या करंजीला बनवायला वेळ लागतो पण सोबतीला कोणी असेल तर मात्र झटपट होते आणि शिणही येत नाही. तर अशी ही आजी, काकू, आई आणि माझी मोठी बहीण यांचा हातखंडा असलेली पुडाची करंजी आज तुमच्या साठी घेऊन आलेय ....

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. 1. पाव किलो मैदा
  2. 2. अर्धी वाटी रवा
  3. 3. 2 टे.स्पून गरम तेलाचे मोहन
  4. 4. 3 टे.स्पून कॉर्नफ्लॉवर (साटा म्हणून वापरण्यासाठी)
  5. 5. पीठ भिजवण्यासाठी पाऊण फुलपात्र पाणी किंवा दूध
  6. 6. चिमुटभर मीठ
  7. 7. तळण्यासाठी तेल
  8. सारण --
  9. 1. एक वाटी खोबरे किस किंवा डेसि केटेड कोकोनट घ्यावे.
  10. 2. पाव वाटी बारीक रवा तुपात छान भाजून घ्यावा.
  11. 3. 2 टे स्पून खसखस भाजून बारीक करुन घ्यावी.
  12. 4. दीड वाटी पिठीसाखर घ्यावी.
  13. 5. एक टे स्पून वेलची पूड घ्यावी.
  14. 6. 5 ते 6 काजूची पूड घ्यावी.
  15. 7. 5 ते 6 बदामची पूड घ्यावी.
  16. हे सर्व साहित्य एकत्र करून सारण तयार करावे.

सूचना

  1. 1. मैदा व रवा एकत्र करून कडकडीत तेलाचे मोहन घालावे चिमूटभर मीठ टाकावे व दुधाने किंवा पाण्याने घट्ट कणिक मळून घ्यावी.
  2. 2. खूप घट्ट वाटले तर थोडा पाण्याचा हात घेऊन गोळा करावा. एक तास कणिक झाकून ठेवून मुरू द्यावी
  3. 3. एक तासानंतर कणिक फूडप्रोसेसर मध्ये मऊ करून घ्यावी
  4. 4. मळलेल्या कणकेचे एकसारखे चार ते पाच गोळे करावेत.
  5. 5. त्याची लाटता येईल तेवढी पातळ पोळी लाटून घ्यावी आणि त्यावर कॉर्न फ्लोअरची पेस्ट लावावी.
  6. 6. त्याचा रोल करावा.
  7. 7. आणि छोट्या लाट्या करून घ्याव्यात.
  8. 8. ही छोटी लाटी चौकोनी आकारात लाटून घ्यावी लाटताना उलटू नये.
  9. साहित्यावर तयार केलेले सारण
  10. 9. कडेला दूध लावून करंजी भरून घ्यावी ही करंजी कापू नये.
  11. 10. गरम तेलामध्ये गुलाबी रंगावर तळावी.
  12. 11. आपली खुखुशीत पुडाची करंजी तैयार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर