मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा मालपोवा

Photo of Rava Malpua by Manisha Lande at BetterButter
1361
4
0.0(0)
0

रवा मालपोवा

Nov-10-2018
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा मालपोवा कृती बद्दल

रव्याचे हे मालपोवा खव्याच्या गुलाबजाम इतके खुप छान लागतात चविला.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी रवा
  2. कोमट दुध आवश्यकतेनुसार
  3. १ वाटी साखर
  4. १ वाटी पाणी
  5. १/४ छोटा चमचा वेलची पूड
  6. ४ ते ५ केशराच्या काड्या
  7. १मोठा चमचा बदामाचे उभे काप
  8. चिमुटभर मीठ
  9. तेल

सूचना

  1. प्रथम रवा मिक्सरमधून बारीक करून घेतला.
  2. नंतर त्यात कोमट दुध, व चिमूटभर मीठ घालून फेसुन छान सरसरीत बॅटर करून घेतले.
  3. एका भांड्यात साखरेचा चिकट पाक ( जिलेबी लागतो तसाच पाक ) तयार करून घेतला.
  4. साखरेच्या पाकात वेलची पूड, केशराच्या काड्या घातल्या.
  5. कढईत तेल गरम करत ठेवले.
  6. गरम तेलात रव्याचे बॅटर वाटीने घालुन मालपोवा दोन्ही बाजूंनी गडद सोनेरी रंगावर तळून घेतले.
  7. तळलेले मालपोवा गरम पाकात १० मिनिटे मुरत ठेवले.
  8. तयार मालपोवा सर्व्हींग डिशमध्ये काढून वरून बदामाचे काप स्प्रिंकल केले.
  9. गरमागरम "रवा मालपोवा" खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर